BANNER

The Janshakti News

जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडीच्या अध्यक्षपदी सुबोध वाळवेकर व सहेली ग्रुपच्या अध्यक्षपदी स्मिता वाळवेकर यांची निवड...=====================================

======================================

भिलवडी : वार्ताहर 

भिलवडी (दि.14) : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी व परीसरात आपल्या सामाजिक व सेवाभावी कामाचा ठसा उमठविणारे एक समाज उपयोगी संघटन म्हणजे जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी होय.

जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडीच्या कार्याचा आढावा घ्यावयाचा झाला तर  स्वर्गीय उद्योजक कै. काकासाहेब चितळे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या या ग्रुपच्या माध्यमातून  भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेच्या समोर महामार्गावर एसटी पिक-अप शेड , खंडोबाचीवाडी विवेक नगर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी पिक-अप शेड ,नेत्रदानाची उल्लेखनीय कामगिरी , गरीब व गरजू रुग्णांना जिवदान म्हणून  रक्तदान शिबिराचे आयोजन , ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे ही आयोजन   जायंटस सप्ताहाच्या माध्यमातून केले जाते. शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप , ऊसतोडणी मजुरांची आरोग्य तपासणी व योग्य त्या आजारावर मोफत औषधे वाटप , स्वच्छता अभियान राबविणे , रांगोळी , वकृत्व स्पर्धा , महिलांच्यासाठी पाककला स्पर्धा , फुड फेस्टिव्हल , ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे ही आयोजन जायंट्स सप्ताहाच्या माध्यमातून केले जाते. याशिवाय अनेक लहान मोठे उपक्रम जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी यांनी केल्यामुळे भिलवडी वासीयांच्या मनात जायन्ट्स ग्रुपचे एक मानाचे स्थान निर्माण झाले आहे.

जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी व जायन्ट्स ग्रुप ऑफ सहेली या सेवाभावी संघटनेची सन २०२४ च्या कार्यकारणीची निवड  बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२३  रोजी चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती स्व. काकासाहेब चितळे यांच्या भिलवडी येथील निवासस्थानी झालेल्या मासिक मिटिंग मध्ये झाली.

सदर मिटिंगच्या अध्यक्ष पदी जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडीचे सुधीर गुरव हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जायन्ट्स ग्रुपचे एनसीएफ मेंबर उद्योजक गिरीश चितळे उपस्थित होते.. तेंव्हा त्या दोन्हीही मान्यवरांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

तर गिरीश चितळे यांच्या मार्गदर्शनानंतर सन २०२४ ची कार्यकरणीची सर्वानुमते  निवड करण्यात आली. यामध्ये जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी अध्यक्षपदी सुबोध वाळवेकर व सहेली ग्रुपच्या अध्यक्षपदी स्मिता सुबोध वाळवेकर  यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.यशस्वी युवा उद्योजक, दूरदृष्टी व्यक्ती, देशभक्त आणि सामान्यांप्रती आदर असणारी व्यक्ती म्हणून सुबोध वाळवेकर यांची पंचक्रोशीतील ओळख आहे. त्यांनी जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडीच्या सन २०२२/२३ च्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्याचबरोबर द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून निरोगी आरोग्यासाठी योग व प्राणायामचा प्रचार व प्रसाराचे काम ते सातत्याने करीत आहेत. युवा वर्गामध्ये पर्यावरणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांचे जिवन आनंदी व्हावे यासाठी त्यांनी एक सायकलिंग ग्रुप तयार करुन युवा पिढीला नवी दिशा देण्याचे काम ते अविरतपणे करीत आहेत. ते सद्या भिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
तसेच स्मिता वाळवेकर यांनी देखील जायन्ट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या सन २०२२/२३ च्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. सामाजिक , शैक्षणिक या शिवाय अनेक लहान मोठ्या उपक्रमांमध्ये त्या हिरीरीने भाग घेत आहेत.

जायन्ट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या मार्गदर्शक श्रीमती सुनिता काकासाहेब चितळे , सौ. भक्ती मकरंद चितळे व सौ. सिमा कपील शेटे यांच्या सह सहेलीच्या सर्व सद्स्यांच्या सहकार्याने जायन्ट्स ग्रुप ऑफ सहेलीच्या अध्यक्षा सौ. स्मिता वाळवेकर यांची अध्यक्षपदी व इतर कार्यकारिणीची एक मताने निवड करण्यात आली.

जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी व जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी सहेली आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी यांचा शपथविधी व पदग्रहण समारंभ थोड्याच दिवसात संपन्न होणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुबोध वाळवेकर यांनी सांगितले. 

जागतिक पातळीवर समाजिक सेवेचे काम करणाऱ्या या सेवाभावी  संस्थेच्या माध्यमातून सर्व जायंटस च्या सहकार्याने सन 2024 मध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे वाळवेकर  दाम्पत्यानी सांगितले. उभयतांना सर्व स्थरातील लोकांनी शुभेच्छा दिल्या.

जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी  -
2024 कार्यकारणी निवड--
अध्यक्ष -  श्री सुबोध  वाळवेकर
उपाध्यक्ष - श्री महावीर भूपाल चौगुले 
उपाध्यक्ष - श्री बाळासाहेब महिंद 
कार्यवाह - श्री निवास गुरव 
सह कार्यवाह - श्री पार्श्वनाथ चौगुले 
खजिनदार - श्री विशाल सावळवाडे.
जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी - सहेली
2024 कार्यकारणी निवड--
अध्यक्ष - सौ स्मिता वाळवेकर
उपाध्यक्ष-सौ उज्वला परीट
उपाध्यक्ष-सौ स्नेहा शेडबाळकर
कार्यवाह - सौ. अमृता चौगुले
खजिनदार - सौ. चैत्राली कुलकर्णी.
आय पी पी -- सौ अनिता गुरव.◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Youtube Link
👇

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Tags