BANNER

The Janshakti News

कुंडल | क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांची १०१ वी जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी ; आदरांजली वाहण्यासाठी समाधीस्थळी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित



==============================
==============================

कुंडल : वार्ताहर

ज्या स्फुल्लिंगाने अनेक वाती पेटवून इंग्रजी सत्तेला नेस्तनाबूत केले, ते फिल्डमार्शल क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी.बापू लाड कुंडल (ता.पलूस) येथे आजही अनेकांना जगण्याची प्रेरणा देतात त्यांच्या धाडसाची ग्वाही देणाऱ्या जिवंत स्मारकातिल समाधीसमोर जयंती निमित्त त्यांच्या आठवणींचा जागर करून पुष्प वाहण्यात आले.

                       क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड 

अमर रहे, अमर रहे, जी.डी.बापू अमर रहे या घोषणांनी क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांची १०१ वी जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी झाली. यावेळी परिसरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, खेळ, सांस्कृतिक, क्षेत्रातील अनेकांनी बापूंना आदरांजली वाहिली.

यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, ऍड प्रकाश लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, दिलीप लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, राजदीप लाड, अमरदीप लाड, रणजित लाड,व्ही.वाय. पाटील, सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार, माजी सरपंच प्रमिला पुजारी, उद्योजक चेतन पारेख, भीमराव माने, जनार्दन पाटील, निशांत पाटील (मोराळे), माजी उपसभापती अरुण पवार, सयाजी पाटील, व्ही. वाय. पाटील(नागराळे), जे.पी.लाड, आनंदराव निकम, क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, श्रीकांत लाड, रावसाहेब गोंदिल(पलूस), गोरख सूर्यवंशी, सुरेश शिंदे, जे.पी.पाटील, चंद्रकांत पाटोळे(मुंबई), पोपट फडतरे, नितीन पवार, संपतराव गायकवाड, निलेश कोरे(बुर्ली), सतीश पाटील, शीतल बिरनाळे (अंकलखोप), व्ही.टी. पाटील, प्रकाश पाटील (कुरळप), माजी उपसरपंच राजाराम पवार, सुनील पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, कुंडलिक एडके, डॉ.व्ही.डी. पाटील, अरविंद कदम(आंधळी), धर्मवीर गायकवाड, दिलीप पाटील(नागराळे), प्रदीप पाटील, बाबुराव पाटील, प्रकाश नलवडे (तुपारी), विनोद पाणबुडे, अमोल पाटील(पुनदी), विशाल शिंदे, रमेश एडके, सुरेश शिंगटे, जयदीप यादव(कडेगाव), संजय संकपाळ (बांबवडे), गुत्तांना बाबर, क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक दिलीप थोरबोले, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, वैभव पवार, संजय पवार, शीतल बिरनाळे, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, बाळकृष्ण दिवानजी, अंजना सूर्यवंशी, अशोक विभूते, सुभाष वडेर यांच्यासह अनेक नागरिकांनी बापूंनी आदरांजली वाहिली. यासह क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना, क्रांतिअग्रणी जी डी बापू लाड महाविद्यालय, प्रतिनिधी हायस्कुल, बसवेश्वर पाणी पुरवठा संस्था, सत्तेश्वर पाणी पुरवठा संस्था, तुपारी दह्यारी घोगाव गणेशवाडी पाणी पुरवठा संस्था, कुंडल विकास सोसायटी, क्रांती सेवकांची पतसंस्था, शिवाजी हायस्कुल चिंचणी, शहीद सुरेश चव्हाण हायस्कुल करोली (टी), जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कुल (शिरढोन), पलूस तालुका खरेदी विक्री संघ, क्रांती अर्बन क्रेडिट सोसायटी, कुंडल ग्रामपंचायत यांच्यासह परिसरातील अनेक संस्थांमधूनही जी.डी.बापूंना आदरांजली वाहण्यात आली.


कुंडल (ता पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या समाधीस अभिवादन करताना आमदार अरुणअण्णा लाड, ऍड प्रकाश लाड, उद्योजक उदय लाड, जिल्हाबँकेचे माजी संचालक किरण लाड, दिलीप लाड, शरद लाड आदी.


हे पण पहा ----




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆