BANNER

The Janshakti News

BREAKING NEWS : सांगली जिल्ह्यात आंदोलनाची ठिणगी पेटली .....क्रांती सह. साखर कारखान्याची दारू घेउन जाणारे ट्रक स्वा.शे.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले






======================================
======================================

इस्लामपूर : वार्ताहर दि. 10 ऑक्टोबर 2023

इस्लामपूर : गत हंगामाततील गाळप झालेल्या उसाला दसऱ्यापूर्वी आणखी ४०० रुपये द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मंगळवारी दि. १० ताकारी ता. वाळवा येथे क्रांती कारखान्याचे ट्रक रोखले. क्रांती कारखान्यात उत्पादित झालेली दारू घेऊन चार ट्रक मुंबई येथील बंदराकडे निघाले होते.ते परत कारखान्यात पाठवण्यात आले.

कारखानदारांनी गत हंगामातील उसाला आणखी ४०० रुपये द्यावेत या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. महात्मा गांधी जयंती दिवशी सांगली जिल्ह्यातील प्रत्येक साखर कारखान्यावर जाऊन संघटनेने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते. मागण्या मान्य झाल्या नाहीतर कारखान्यातून बाहेर पडणारी साखर, इतर उत्पादीत पदार्थ रोखण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मात्र, कारखानदारांनी ती मागणी बेदखल केली. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मंगळवारी दि. १० सायंकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव , प्रवक्ते ऍड एस.यू.संदे , जगन्नाथ भोसले, अनिल करळे, प्रताप पाटील, पंडित सपकाळ, बाबुराव शिंदे, सचिन यादव यांच्यासह कार्यकर्त्यांनी क्रांती कारखान्याचे ट्रक रोखून पाठीमागे पाठवले.मागण्या मान्य झाल्या नाहीतर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

आष्टा (ता.वाळवा) येथील noisey studio मधील saim sutar , Aakash atugade , apurv gane आणि त्यांची संपूर्ण टीम यांची short film...The ai night mare

पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://youtu.be/7-NCWKIg9lo?si=n8b7DfCJwTh4PlSC

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆