BANNER

The Janshakti News

अंकलखोपचे नुतन तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत उर्फ बबलू (भैया) सुर्यवंशी यांचा भिलवडी येथे भव्य सत्कार=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर              दि. 11 ऑक्टोबर 2022

पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच झाली असून अध्यक्ष पदावर प्रशांत उर्फ बबलू (भैया) सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

गावातील तंटे गावातच मिटवून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्थरावर महात्मा गांधी तंटामुक्त समितीची स्थापना करण्यात येते. त्यानुसार अंकलखोप ग्रामपंचायत येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते प्रशांत उर्फ बबलू (भैया) सुर्यवंशी यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाले बद्दल भिलवडी ( ता.पलूस ) येथे आज बुधवार दि.11 ऑक्टोबर रोजी
 भिलवडी गावचे काँग्रेसचे नेते व सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य संग्राम दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जत चे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचे चिरंजीव धैर्यशील सावंत यांच्या उपस्थितीत भिलवडी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा शाल ,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन भव्य सत्कार करण्यात आला.


यावेळी दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब मोहिते , उत्तर भाग सोसायटीचे माजी चेअरमन रमेश पाटील , सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस बी.डी.पाटील , ॲड. रमेश मोहिते , ग्रामपंचायत माजी सदस्य सचिन पाटील , शशिकांत उंडे , राहुल कांबळे , सनी यादव ,अमोल यादव, प्रकाश यादव यांच्या सह आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. 
 यावेळी बोलताना सत्कारमुर्ती प्रशांत उर्फ बबलू (भैया) सुर्यवंशी म्हणाले की, अंकलखोप गावाने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडून गावातील छोटे मोठे तंटे गावातच मिटवून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत असे बोलून त्यांनी उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆