BANNER

The Janshakti News

क्रांती सह. साखर कारखाना वेगवेगळ्या ऊस विकास योजना राबवित आहे त्याचा लाभ कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी घ्यावा......शरद लाड


======================================
======================================

कुंडल : वार्ताहर दि. १ सप्टेंबर २०२३

कुंडल (ता.पलूस) : कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस लागणीसाठी 25 लाख ऊस रोपांची निर्मिती क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सह. साखर कारखाना करणार असून यातून तयार झालेले दर्जेदार ऊस रोपे शेतकऱ्यांना मिळतील असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले.

ते कारखान्याच्या प्लास्टिक ट्रे मधील ऊस रोपांच्या निर्मिती शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले कि, ऊस लागण टिपरी पध्दतीने करण्यापेक्षा
रोपे वापरून करणे अधिक फायदेशीर आहे. यातून ऊसात सांधमोड करणेच्या खर्चात बचत होते, फुटवे एकसारखे येतात, एकरी 6 ते 7 मे. टन उत्पादन वाढ मिळते, जमीनीचा, पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन खर्चात बचत होते असे अनेक फायदे आहेत.

कारखाना ऊस रोप निर्मितीसाठी संशोधन केंद्रातून आणलेल्या मुलभूत बेण्यापासून पायाभूत व प्रमाणीत श्रेणीची रोपे तयार करून पुढील वर्षासाठी बेणे मळा म्हणून शेतक-यांना पुरवठा करणार आहे.


कारखाना कार्यक्षेत्रातून दरवर्षी सुमारे 10 हजार एकर लागण ऊस कारखान्यास गाळपासाठी होतो. यापैकी सुमारे तीन हजार एकर ऊस क्षेत्र रोप पध्दतीने लागण होते. या क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून कारखाना वेगवेगळ्या ऊस विकास योजना राबवित आहे. त्याचा लाभ कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कारखाना कर्मचारी, कंत्राटदार, शेतकरी उपस्थित होते.


क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावरती ऊस रोप निर्मितीचा शुभारंभ करताना शरद लाड, माजी संचालक संदीप पवार.

आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
👇


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆