BANNER

The Janshakti News

महाराष्ट्रात सुरू असणारे दलितांवरील अत्याचार थांबवा ; आर.पी.आय. पक्षाची मागणी


...तहसीलदारांच्या मार्फत महाराष्ट्र शासनास निवेदन




======================================
======================================

पलुस : वार्ताहर                दि.३१ ऑगस्ट २०२३

महाराष्ट्रामध्ये सुरू असणारे दलित अत्याचार थांबविण्यात यावे, त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मातंग समाजातील महिलेला अमानुष मारहाण व अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या दलित तरुणावरील अत्याचाराच्या घटनेच्या संदर्भात पलुस तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आरपीआयचे पलुस - कडेगाव विधानसभा अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे व शिष्टमंडळाने पलुस तहसील कार्यालयात निवेदन दिले.
यावेळी आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश तिरमारे पलूस तालुका अध्यक्ष बोधिसत्व माने, मुस्लिम आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमजान मुजावर युवक पोलीस तालुकाध्यक्ष अविराज काळीबाग, विधानसभा उपाध्यक्ष शितल मोरे उपस्थित होते. यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष बोधिसत्व माने व विधानसभा अध्यक्ष विशाल भाऊ तिरमारे,युवक तालुकाध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी मनोगत व्यक्त करून दलित अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त केला.


निवेदनात लिहिले आहे की महाराष्ट्रामध्ये दोन वर्षात अतिशय गंभीरपणे मागासवर्गीय दलित व मुस्लिम समाज्यावर अन्याय अत्याचार वाढले आहेत.राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही...? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेमध्ये पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका दलित समाजातील तरुण युवकाला झाडाला बांधून मारण्यात आले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दलित समाजावर दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात एका दलित समाज्यातील स्त्रीला भर चौकात किरकोळ कारणावरून लाकडी बांबूने अमानुषपणे मारण्यात आले सदर प्रकरणे महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचार धारेला त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला काळीमा फासणारी आहेत.

महाराष्ट्र हा पुरोगामी असून या महाराष्ट्राने सबंध देशाला एक वैचारिक दिशा दिली आहे. महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन देशातील नागरिकांचा दलित अत्याचारामुळे बदलत चालला आहे. गृहमंत्री व मुख्यमंत्री दलित अत्याचार थांबवण्यास असमर्थ ठरत आहेत. पोलीस यंत्रणा गुन्हेगारांच्या पाठीशी उभी राहत असल्याचे दिसून येत आहे तरी आम्ही पलूस तालुक्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने आपणास निवेदन देत आहोत की महाराष्ट्रातील दलित अत्याचार शासनाने थांबविण्यासाठी कठोर पावले उचलावी. त्याचप्रमाणे कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे. महिलांना दलीत - मुस्लिमांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी अशा पद्धतीचे काम पोलीस प्रशासनाकडून व्हावे यासाठी कार्यवाही करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष व तालुक्यातील दलित समाज संघटनांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ येत्या काळात पलूस तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ अतिशय उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे आरपीआयच्या वतीने देण्यात आला.


यावेळी दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष गणेश वारे, मानवहित लोकशाही पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष सागर महापुरे,पत्रकार पंकज गाडे, युवक आरपीआय पलुस तालुका उपाध्यक्ष यश बाबा ऐवळे, अंकलखोपचे विकास वारे, सनी कोले, बुर्लीचे धनाजी जावीर, नागराळे गावचे अनिकेत जाधव, दुधोंडीचे अक्षय तीरमारे, नवी पुंनदीचे वैभव जाधव,सावंतपुरचे किरण सदामते यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
                           👇


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆