BANNER

The Janshakti News

रामानंदनगर येथे होणाऱ्या समाधान मेळाव्याचा लाभ घ्या ; .....पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांचे आवाहन

 


                                     बाईट पहा
                                          👇======================================
======================================

पलूस : वार्ताहर                           दि. ०४ ऑगस्ट २०२३
           
 
 एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त पलूस तहसिल कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शनिवार दि. 5 ऑगस्ट रोजी रामानंदनगर ता. पलूस येथे समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या चा लाभ पलूस तालुक्यातील सर्व गावांमधील नागरिकांनी घ्यायचा आहे. महसूल विभाग ,आरोग्य विभाग,पंचायत समिती विभाग,वीज वितरण, कृषी या संबंधी असणारी प्रलंबित कामे या समाधान मेळाव्यात मार्गी लावली जातील तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा. महसूल अंतर्गत दुबार रेशन कार्ड, रेशन कार्ड मधील नावांची दुरुस्ती, संजय गांधी योजने संदर्भाची कामे, पंचायत समिती मधील घरकुल योजनेची कामे ही सर्व कामे समाधान मेळाव्यामध्ये होणार आहेत तरी रामानंदनगर मध्ये होणाऱ्या समाधान मेळाव्याचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आव्हान तहसीलदार निवास ढाणे यांनी केले आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆