BANNER

The Janshakti News

सैनिकांच्या इतकाच त्यांच्या कुटूंबियांचाही आदर राखला पाहीजे : जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे .=====================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                  दि. १८ ऑगस्ट २०२३सैनिक देशासाठी सीमेवर लढतो आहे . म्हणूनच देशातील लोक शांततेत जीवन जगत आहेत . आपण सुरक्षित आहोत . सैनिकांना जेवढा मान सन्मान आपण देतो सैनिकांच्या बरोबरीने सैनिकांच्या कुटूंबियांचाही समाजाने सन्मान करावा आज देशाची किर्ती जगभर सैनिकांच्यामुळे गाजत आहे. असे प्रतिपादन भिलवडी (ता .पलूस ) येथील आजी माजी सैनिक संघटनेच्या ८ व्या स्नेह मेळाव्या प्रसंगी अध्यक्ष स्थाना वरून जेष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांनी केले.
ते १५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिना निमित्त आजी माजी सैनिक संघटनेने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते . यावेळी प्रमुख पाहुणे साहित्यिक रवि राजमाने . उद्योजक पाटील डेअरी स्वप्नील पाटील .सौ. रेखा घार्गे . सांगली जिल्हा सैनिक बोर्डाचे उपाधिकारी अनिल जवळकर . स्टेट बँकेचे योगेश रायुत कॅशियर प्रथमेश कुलकर्णी .आदी उपस्थीत होते . यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष कयुम पठाण यांनी सर्व प्रमूख पाहुण्यांचा सत्कार केला .स्टेट बँकेचे योगेश राऊत म्हणाले बँकेकडून आजी माजी सैनिक संघटनेला सहकार्य राहील . साहित्यिक रवि राजमाने यांनी सैनिकांच्या जिवनावर कथा सांगीतली .सौ. रेखा घार्गे म्हणाल्या सेवानिवृत्तीनंतर सैनिकांचे आयुष्य आनंदी रहावे यासाठी मार्गदर्शन केले . अनिल जवळकर यांनी शासनांच्या वतीने राबविल्या जाणारया विविध उपक्रमांची व योजनांची माहीती माहिती दिली . उदयोजक स्वप्नील पाटील यांनी आमच्या डेअरी परिसरात  आजी माजी सैनिकांचा मेळावा हा उपक्रम होत असल्या बद्दल आनंद व्यक्त केला . डेअरी मार्फत सर्वतोपरी मदत राहील असे आश्वासन दिले . प्रारंभी अमर ज्योती फलकास अभिवादन करून दिपप्रज्वलन करण्यात आले . या कार्यक्रमाचे स्वागत खजिनदार उत्तम भोई यांनी करुन आजी माजी सैनिक संघटनेच्या राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहीती दिली . 


यावेळी  माजी सैनिक कुंडलीक कोळी यांनी पत्नीच्या स्मणार्थ सैनिक संघटनेला आर्थीक मदत केली .आजी माजी सैनिक संघटनेचे मारूती यादव . अभिजित यादव . सचिन चौगुले . जितेंद्र मराठे . प्रकाश नावडे . यांनी संयोजन केले होते .आभार मुकूंद तावदर यांनी मानले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .
भिलवडी : आजी माजी सैनिकांच्या ८व्या स्नेहमेळाव्यात बोलताना साहित्यिक सुभाष कवडे शेजारी रवि राजमाने . स्वप्नील पाटील . सौ . रेखा घार्गे . अनिल जवळकर .योगेश रायुत आदी .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆