BANNER

The Janshakti News

कारगील युध्दात सहभागी असणारे माजी सैनिक दत्तात्रय बापू पाटील यांचे निधन..=====================================
=====================================

भिलवडी :                    दि. ११ ऑगस्ट २०२३

पलूस तालुक्यातील भिलवडी गावचे सुपुत्र माजी सैनिक श्री दत्तात्रय बापू पाटील यांचे शुक्रवार दिनांक ११/०८/२०२३ रोजी वयाच्या ६२ वर्षी अल्पशा अजाराने दुख:द निधन झाले.
 
त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुले , १ मुलगी  , सुन नातवंडे असा परीवार आहे.

दत्तात्रय  पाटील हे भिलवडी येथील आजी माजी सैनिक संघटनेचे संचालक तसेच उत्तर भाग सोसायटीचे  माजी चेअरमन होते. ते दत्ता काका या नावाने भिलवडी व परीसरात परिचित होते. त्यांचा जन्म १९६१ चा, आणि ते भारतीय सेनेत १९८२ मध्ये भरती झाले होते. 18 मेक एनफंट्री मध्ये त्यांनी कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. तसेच ते बी एम पी टॅन्कचे गणर होते. तसेच मिसाईल चालवण्यामध्ये अतिशय निपुण असे सैनिक होते. पलाटून हवालदार म्हणून त्यांनी सहा वर्षे काम पाहिले आणि  31 मार्च 2000 मध्ये सेनेतून निवृत्त झाले. अशा कारगिल योध्याचे शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी अल्पशा अजाराने दुख:द निधन झाले. 


रक्षाविसर्जन - 

रविवार दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी
सकाळी ९:३० वाजता 
कृष्णाघाट भिलवडी येथे होणार आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆