BANNER

The Janshakti News

सांगली जिल्ह्यातून अनेक खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री झाले परंतु वाळवा तालुक्यांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी कोणाचीही इच्छा झाली नाही. ....अशोकराव वायदंडे (जहाल नेते) डी.पी.आय



 =====================================
======================================
वाळवा : वार्ताहर                      दि. ०१ ऑगस्ट २०२३

१ ऑगस्ट हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त त्यांना डी पी आय  पक्षाच्या वतीने मी विनम्र अभिवादन करीत आहे. 



संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे व कामगारांचे नेते व मराठी भाषकांचे पहिले  साहित्यिक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिवस एक ऑगस्ट रोजी प्रत्येक वर्षी या राज्यामध्ये गावागावांमध्ये शहरा शहरांमध्ये खेड्यांमध्ये जयंती उत्सव साजरा केला जातो. मातंग समाज हा फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे या विचाराने या राज्यामध्ये काम करीत आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने अनेक सामाजिक व राजकीय संघटना या राज्यामध्ये काम करीत आहेत. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या म्हणून महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला आहे परंतु दिल्लीमध्ये तो आवाज पोहोचला नाही. जगामध्ये अण्णाभाऊंच्या नावाचा डंका वाजत आहे, रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे परंतु या भारत देशात व महाराष्ट्र राज्यांमध्ये अण्णा भाऊंचे राष्ट्रीय स्मारक व पुतळा उभा करण्यास महाराष्ट्र सरकार उदासीन आहे हा प्रश्न आम्हाला पडला आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे गाव वाटेगाव तालुका वाळवा हा  तालुका क्रांतिकारकांचा म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये अनेक नेत्यांचा जन्म झाला आहे ,व अनेक उंच पदावर विराजमान झाले आहेत परंतु अण्णाभाऊ साठे यांचे इस्लामपूर या तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व पुतळा उभा करावा असे कधीही विधानपरिषद किंवा विधानसभेमध्ये मांडले नाही.

डझन भर आमदार , खासदार , मंत्री, मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातून   झाले. 
     विधानसभा व लोकसभेचे नेतृत्व या मंडळीने केले परंतु वाळवा तालुक्यांमध्ये राष्ट्रीय स्मारक व्हावे व पुतळा व्हावा यासाठी त्यांची इच्छा झाली नाही. 
...अशोकराव वायदंडे (जहाल नेते) डी.पी.आय

त्यांच्या हातामध्ये सत्ता संपत्ती असताना सुद्धा देता आले नाही ही बाब फार गंभीर आहे याच्या पाठीमागे नक्कीच काही ना काही कारण दडले असणार.
   राजकारणासाठी मातंग समाजाचा वापर करायचा सत्ता घ्यायची मात्र मातंग समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष करायचे असे गेल्या 75 वर्षांमध्ये सुरू आहे.
मात्र आजचा मातंग समाजाचा तरुण या राज्यांमध्ये पेटून उठला आहे तो परिवर्तनाची भाषा बोलत आहे तो जय भीम बोलू लागला आहे जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे हा आवाज देत आहे. आता तरी जागे व्हा अन्यथा काळ तुम्हाला माफ करणार नाही. या जातीवादी भांडवलवादी प्रस्थापित हुकूमशाहीला गाडून टाकूया जय भीम जय भारत ,जय अण्णाभाऊ, जय लहुजी.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या महानायकास विनम्र अभिवादन.
मा. अशोकराव वायदंडे (जहाल नेते) डी.पी.आय

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆