BANNER

The Janshakti News

जयचंदाच्या औलांदीचा बंदोबस्त करा. आधुनिक जयचंद "मनोहर उर्फ संभाजी भिडे' याच्यावर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत देशद्रोहाचा खटला दाखला करा....


संजय कांबळे
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांची
मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मागणी.

======================================


======================================

सांगली : वार्ताहर               दि.०१ जुलै २०२३

सांगली : संजय कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार..वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मा.जिल्हा पोलीस अधीक्षकसो यांना निवेदन देण्यात आले.  सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला. भारत देशात अनेक जाती, धर्माचे, पंथाचे लोक संविधानिक चौकटीत राहून आपले जिवन आनंदी, सुखी, समाधानी तसेच सामाजिक सलोखा कायम ठेवून गुण्यागोविंदाने आपण भारतीय आहोत या जाणिवेने आपले जीवन व्यतीत करीत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात श्रमिक,कष्टकरी, कामगार, कर्मचारी, सर्व जाती धर्माच्या लोकांना नव्हेतर पशु पक्षी प्राणी यांनाही न्याय देण्यासाठी मुलभूत तत्वांचा समावेश केला आहे.
भारतीय संविधानाच्या मुलभूत तत्वानुसार आपल्या राष्ट्रगीताला खूप महत्त्व आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना तसेच भारतातील सर्व राज्यांना एकत्र ठेवण्याचे तसेच विविध संस्कृतीने नटलेल्या परंपरांचा जन - गण - मन अधिनायक जय हो. हे सर्व भारतीयांना जयघोष करतांना गर्व वाटते असे गीत आहे. तसेच भारतीय ध्वजाला संविधान मध्ये खूपच महत्त्व व संरक्षण दिले आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी व 
१ मे महाराष्ट्र दिन आणी १५ ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक संपूर्ण भारतात ध्वज फडकविला जातो. तसेच ध्वज शिष्टाचार नुसार वेळेत उतरवून सन्मानपूर्वक जपून ठेवले जात आहे. सर्व शासकीय कार्यालयावर तसेच भारतीय सीमेवर मोठ्या अभिमानाने भारतीय राष्ट्रध्वज ध्वजस्तंभावर  फडकविला जातोय. भारतीय सीमेचे आणि राष्ट्रध्वजाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैनिक  रात्रंदिवस खडा पहारा देत उन्हाळा,पावसाळा,हिवाळा या तीनही ऋतू मध्ये  अभिमानाने अखंड उभे आहेत. जागतिक स्तरावर होणाऱ्या विविध क्रीडास्पर्धाच्या वेळी भारतीय नागरिक अनेक देशांमध्ये जावून आपला राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देतात.
भारतीय राष्ट्रगीत तसेच राष्ट्रीय ध्वजाचा अवमान कोणी केल्यास त्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे भारतीय कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच भारतीय कायदा हा श्रीमंत - गरीब, उच्च - निच्च असा कोणताही प्रकारचे भेदभाव न करता कायदा सर्वांसाठी समान आहे. परंतु आज एखादा विशिष्ट जातीच्या अविचारी, देशाभिमान नसणारा व्यक्तीला हे सरकार पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसत आहे. भारत देशात महाराष्ट्र राज्यातील सांगली शहर राहात असणारे आपल्या देशात स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणून साजरा करा, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. तसेच राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी वक्तव्य व सामाजिक सलोखा बिघडण्याचे कारस्थाने करीत असणारे आधुनिक जयचंद मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केली आहेत.
 गलिच्छ अश्लिल भाषेत राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान तसेच स्वतंत्र दिनाबाबतीत अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरली असणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे याचा जाहीर निषेध वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्या करीत आहे. 
देशद्रोही विधाने करून देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण केला आहे. या देशद्रोही आधुनिक जयचंदापासून भारतीय संविधानाला धोका आहे. मनोहर उर्फ संभाजी भिडे हा स्वत:ला गुरूजी म्हणून घेतो आणि मानवतेचा समतेचा संदेश देणारा धडा शिकविण्या ऐवजी बहुजन मुलांची माथी भडकावून देशाचे भवितव्य एकोपा धोक्यात येईल या दृष्टिकोनातून कटकारस्थान रचत आहे.  सामाजिक सलोखा बिघडण्याचे उद्योग सुरू केला आहे. 


तरी अश्या जयचंदाच्या औलांदीवर भारतीय राष्ट्र गीतांचा व राष्ट्रीय ध्वजाचा तसेच स्वातंत्र दिनाचा, भारत स्वतंत्र होण्यासाठी आपल्या जीवाची आहुती बलिदान देणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र सैनिकांचा,विरांचा अपमान केला आहे. तसेच तमाम भारतवासी यांची भावना दुखावल्या गेल्या मुळे संभाजी भिडे वर देशद्रोह्याचा खटला महाराष्ट्र शासनाने दाखल करावा. समाजातील निर्माण झालेल्या मानसिक प्रवृत्तीचा किडीचा कायमस्वरूपी उपचार, बंदोबस्त करावा. अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. आसा इशारा देण्यात आला, यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष मा.संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव मा.अनिल मोरे सर, जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजय भूपाल कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष मा.हिरामण भगत, जिल्हा उपाध्यक्ष मा.सिध्दार्थ कांबळे, सांगली शहर अध्यक्ष मा. युवराज कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष इसाक सुतार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मा.मानतेश कांबळे, सांगली शहर अध्यक्ष मा. शिवाजी उर्फ पवन वाघमारे, मिरज तालुका महासचिव मा.सागर आठवले, कवठेमहांकाळ तालुका महासचिव मा.विज्ञान लोंढे, तालुका उपाध्यक्ष मा.सचिन वाघमारे, भीम प्रतिष्ठानचे मा.प्रशिक कांबळे, राहुल रोहिटे, अशोक माळी, गणेश पवार, विठ्ठल जाधव, सुभाष पाटील, बाबासाहेब कांबळे, सुरेश आठवले,आकाश बनसोडे,योशोधन संद्दी, जावेद आलासे, रियाज शेख,आलताप देसाई, मानसिंग खांडेकर, आनंदा गाडे, बंदेनवाज राजरतन, अनिल कांबळे तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश माने यांच्या बरोबर बहुसंख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆