BANNER

The Janshakti News

सन 1962, 65, 71 च्या युद्धातील महान योध्दा , माजी सैनिक भिलवडी चे सुपुत्र युसुफ पठाण यांचे निधन======================================
======================================भिलवडी : वार्ताहर                             दि. ३० जुलै २०२३


सन 1962 मध्ये झालेले भारत-चिन युद्ध , 1965 मध्ये झालेले भारत - पाकिस्तान युध्द आणि 1971 मध्ये झालेले भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध अशा या तिन्ही युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेले भिलवडी गावचे  सुपुत्र  माजी सैनिक युसुफ गुलाब पठाण यांचे काल शनिवार दि. 29 जुलै 2023 रोजी भिलवडी येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , एक मुलगी व नातवंडे असा परीवार आहे.


युसुफ  पठाण यांनी भारतीय लष्करात आर्मी सफलाई कोर या पदावर काम केले होते. तसेच ते भिलवडी येथील आजी माजी सैनिक संघटनेचे सद्स्य देखील होते.

जियारत (रक्षाविसर्जन) ----

मंगळवार दि. 01 ऑगस्ट 2023  रोजी 
सकाळी 10:00 वाजता 
कृष्णा नदी काठ कबर्स्तान भिलवडी येथे होणार आहे.अश्या महान योद्ध्याच्या आत्मास चिर शांती लाभो हीच अल्ला जवळ प्रार्थना ..
 
शोकाकुल - आजी-माजी सैनिक संघटना , भिलवडी

युसुफ चाचा 
अमर रहे..! अमर रहे..! अमर रहे..!

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆