BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध======================================
======================================

कुंडल : वार्ताहर              दि. ३० जून २०२३

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. एस.एन. जाधव यांनी काम पाहिले. सर्व नवनिर्वाचित संचालकांनी क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, सर्व संचालकांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात, ऊस लागवडीचे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांच्या आणि पर्यायाने कारखान्याच्या उत्पादनात वाढ करावी. सर्वांनी जी.डी.बापूंच्या नावाला शोभेल असे काम करावे. सरकारच्या तकलुबी धोरणांमुळे सहकार अडचणीत येत आहे पण आपण सहकारातून बापूंचे विचार रुजवत आहोत त्यामुळे येईल त्या अडचणी सोडवून सहकार टिकवून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देऊया.


नवनिर्वाचित संचालकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले की, क्रांती कारखान्याचा संचालक होणे हे भाग्याचे आणि मानाचे आहे. क्रांती कारखाना हा देशातील सर्वोकृष्ट सहकारी साखर कारखाना आहे याचे संचालक होणे म्हणजे आमदार झाल्या सारखेच असल्याचे नवनिर्वाचित संचालकांनी मत मांडले. इथून पुढे क्रांतीची नीतिमूल्ये समाजात रुजवण्याची ग्वाही सर्व संचालकांनी दिली.


क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक पुढील प्रमाणे :

 मा. अरुण गणपती लाड , मा. जितेंद्र निवृत्ती पाटील , मा. भगवंत तानाजीराव पाटील , मा. दिलीप बाबुराव थोरबोले , मा. शरद अरुण लाड , मा. अशोक बजरंग विभुते , मा. रामचंद्र गणपतराव देशमुख , मा. संजय रामचंद्र पवार , मा. अविनाश राजाराम माळी , मा. सुकुमार रामचंद्र पाटील , मा. शितल महावीर बिरनाळे , सौ. अश्विनी श्रीरंग पाटील , मा. सतिश नाभिराज चौगुले , मा. संग्राम खनाजीराव जाधव , सौ. अंजना गोरखनाथ सुर्यवंशी , मा. बाळकृष्ण शंकर दिवाणजी , मा. अनिल शिवाजी पवार , मा. प्रभाकर सावंता माळी , मा. वैभव विलास पवार , मा. जयप्रकाश दत्तात्रय साळुंखे , मा. सुभाष तम्मा वडेर.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆