BANNER

The Janshakti News

तब्बल 48 दिवसानंतर बाळ सुखरूप... बाळ आई वडिलांना स्वाधीन

डॉ खंबाळकर यांच्या हॉस्पिटल मधील घडलेली घटना










=====================================
=====================================

पलूस : वार्ताहर दि. १६ जून २०२३

तब्बल 48 दिवसानंतर उपचार केल्यावर जन्मलेल्या बाळाला सुखरूप त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्त करण्यात आले, ही किमया घडली डॉक्टर खंबाळकर यांच्या हॉस्पिटलमध्ये त्याचे घडले असे, किर्लोस्करवाडी येथे खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे .येथील सावंतपूर वसाहत येथे हे हॉस्पिटल सुरू झाले आहे. हे हॉस्पिटल म्हणजे परिसराला मिळालेली संजीवनी आहे .अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील पाटील दांपत्या ची एक महिला गर्भावस्थेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आली. सातव्या महिन्यातच तिच्या पोटात दुखू लागलं आणि वेळेआधीच तिची प्रसूती करण्याची वेळ स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शोभा खंबाळकर यांच्यावर आली .ऑक्सिजन कमी असल्याने बाळाच्या आईला ऑक्सिजन लावण्यात आला होता. गर्भवती महिलेला 28 आठवडे पूर्ण झाले होते प्रसूतीनंतर जन्माला आलेलं बाळ त्याचं वजन 900 ग्रॅम होतं,बाळाच्या जीवाला धोका आणि त्याच्या आईच्या जीवाला धोका असे असतानाही डॉक्टर शोभा खंबाळकर यांनी त्या महिलेची यशस्वीरित्या प्रसुती केली आणि सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. धैर्यशील खंबाळकर यांच्या देखरेखी खाली एन आय सी यु मध्ये या बाळाची ट्रीटमेंट करण्यात आली.


बाळाचे ठोके व्यवस्थित लागत नव्हते .त्याचबरोबर एन आय सी यु मध्ये बाळ चे उपचार करण्यात आले पंधरा दिवस बाळाला ऑक्सिजन लावण्यात आला होता. तब्बल 48 दिवसानंतर यशस्वीरित्या उपचार केल्यानंतर ते बाळ आधी 900 ग्रॅम आधी असलेले नंतर 1600 ग्रॅम वजनाचे झाले .48 दिवस रात्र डोळ्यात तेल घालून त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. नंतर सुखरूपरीत्या त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.


यावेळी डॉक्टर धैर्यशील खंबाळकर, शोभा खंबाळकर यांच्याबरोबरच त्यांच्या सर्व स्टाफ त्यांनी आनंद व्यक्त केला होता .बाळाच्या आई-वडिलांनी सर्व स्टाफ ला दवाखान्यात आलेल्या सर्व रुग्णांना पेढे वाटप केले. डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन , तुमच्यामुळेच बाळाला आणि बाळाच्या आईला नवसंजीवनी मिळाली असे त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्या प्रति आभार व्यक्त केले . यावेळी दवाखान्यात सर्व स्टाफ ने फुलांचा वर्षाव त्या बाळाच्या आई वडिलांच्या वर डिस्चार्ज होत असताना केला आणि आनंद साजरा केला. यावेळी सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ धैर्यशील खांबाळकर, स्त्री रोग तज्ञ डॉ शोभा खंबाळकर अस्थिरोग तज्ञ डॉ. शौर्यशील खंबाळकर यांच्यामुळे या परिसराला जीवदान देणारी नव संजीवनी मिळाली असल्याचे परिसरामध्ये बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदत फंडातून पन्नास हजार रुपयांची मदत ही त्यांनी रुग्णांना मिळवून दिली त्या बद्दल ही समाधान व्यक्त करण्यात आले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆