BANNER

The Janshakti News

एकजुटीने संघटित झालो तरच समाजाला न्याय मिळेल - सुधाकर वायदंडे यांचे प्रतिपादन

 पलूस येथे दलित महासंघाची विभागीय बैठक संपन्न


======================================
======================================

पलूस : वार्ताहर (दि. २२/०५/२०२३)

एकजुटीची ताकद निर्माण करून संघटित झालो तरच समाजाला न्याय मिळेल असे प्रतिपादन दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी केले.
                ते  दलित महासंघाची नवीन पदाधिकारी निवडी व विभागीय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.पलूस येथील हॉटेल हौसाई येथे सदर बैठक पार पडली.


                दलित महासंघाचे कार्याध्यक्ष सतीशदादा मोहिते,प. महा निरीक्षक तासगांव नगरपरिषदेचे मा. आरोग्य सभापती म्हाकू मोरे मेहरबान,जेष्ठ पत्रकार अधिकराव लोखंडे आबा,प. महा कोशाध्यक्ष दिनकर नांगरे प्रमुख उपस्थित होते.


      बैठकीच्या प्रारंभी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्रा. मधुकर वायदंडे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   
        
 यावेळी दलित महासंघाच्या सांगली जि. संघटकपदी जेष्ठ नेते दिलीप सदामते, युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी चिरंजीव मोरे, युवक आघाडी तालुका अध्यक्षपदी गणेश मोरे यांच्या प्रदेशाध्यक्ष सुधाकर वायदंडे व कार्याध्यक्ष सतीशदादा मोहिते यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवडी करण्यात.




                   सुधाकर वायदंडे म्हणाले,युवकांना शिक्षण व रोजगाराची संधी शासनाकडून उपलब्ध करून देणे,अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे,शासकीय योजणांच्या फक्त घोषणा केल्या जातात परंतु त्या योजनांची ठोस अंमलबजावणी होत नाही यासाठी दलित महासंघाच्या माध्यमातून समाजाला एकजुटीने संघटित करुन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
               बहुजन, दलित आदिवासी बरोबर शोषीत, पीडित, वंचित तसेच समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी दलित महासंघाची मजबूत बांधणी करणार असल्याचे सुधाकर वायदंडे यांनी सांगितले.


                    यावेळी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष सुरज कांबळे, तासगाव ता. अध्यक्ष बाळासाहेब फाळके,वाळवा ता. अध्यक्ष नारायण वायदंडे, दादा भोरे राजेश वायदंडे,रोहित चव्हाण पारधी हक्क अभियान महिला आघाडी पलूस ता.प्रमुख उषा चव्हाण, तासगांव ता. प्रमुख जयश्री शिंदे,संजय घाटे,गणेश मोरे, महेश सदामते, विशाल सदामते प्रकाश चव्हाण  यांच्यासह मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पलूस ता अध्यक्ष जनार्दन देवकुळे यांनी तर आभार गणपत सदामते यांनी मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆