BANNER

The Janshakti News

निधन वार्ता - स्व. बाळासाहेब काका पाटील यांच्या पत्नी मालनदेवी बाळासाहेब पाटील (काकू) यांचे दुख:द निधन..==============================
==============================

भिलवडी वार्ताहर : दि.२१ मे २०२३

------------------------------------------------------

भिलवडी (ता.पलूस) : स्वर्गीय बाळासाहेब काका पाटील यांच्या पत्नी मालनदेवी बाळासाहेब पाटील (काकू) यांचे रविवार दि.२१ मे रोजी वयाच्या 73 व्या वर्षी भिलवडी येथील राहत्या घरी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे तसेच भिलवडी शिक्षण संस्था भिलवडीचे संचालक यशवंतराव उर्फ राजू (दादा) पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम (दादा) पाटील यांच्या मातोश्री तर भिलवडी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या त्या आजी होत्या.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

रक्षाविसर्जन कार्यक्रम -------
मंगळवार दि.२३/०५/२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता
भिलवडी येथील कृष्णानदीकाठी, कृष्णा घाटावर होणार आहे.

मालनदेवी बाळासाहेब पाटील (काकू)
मृत्यू - रविवार दि.२१/०५/२०२३

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆