जयंतीनिमित्त "भीम प्रतिष्ठान"तर्फे आदरांजली कार्यक्रम
=====================================
सोलापूर | दि. १५ एप्रिल २०२३
सोलापूर : ग्रंथ प्रामाण्यापेक्षा बुद्धी प्रमाण्यवाद हा मानवी जीवनाच्या विज्ञानिक व भौतिक विकासासाठी महत्त्वाचा असून यासाठी शिक्षण महत्त्वाचे आणि अनिवार्य आहे. महात्मा फुले यांचे जीवन व कार्य ज्ञानसाधनेसाठी प्रेरणास्रोतच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रावसाहेब पाटील यांनी केले.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त "भीम प्रतिष्ठान"तर्फे आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. पाटील पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांचे विचार नव्या पिढीने आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्याचे उच्च व व्यावसायिक शिक्षण सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून तरुणांनी कौशल्य शिक्षण आणि प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी गुणवत्तप्रधान शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
प्रारंभी डॉ. पाटील, भीम प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे, अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्याध्यक्ष ऍड. विशाल मस्के यांनी सर्वांचे स्वागत केले तर कोषाध्यक्ष सिद्धांत बाबरे, सचिव अकबर शेख, उपाध्यक्ष अमर साळवे, सचिन गायकवाड यांनी उपस्थितांचा सत्कार केला.
महात्मा फुले यांच्या जयंतिनिमित्त "भीम प्रतिष्ठान"तर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, बाबा बाबरे, वीरेंद्र हिंगमिरे, ऍड. विशाल मस्के, सिद्धांत बाबरे, अकबर शेख, अमर साळवे, सचिन गायकवाड.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆