BANNER

The Janshakti News

सण-उत्सव जयंती शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा सा.पो.नि.नितीन सावंत यांचे आवाहन...


    
                                व्हिडीओ
                        👇
                              ======================================
======================================

भिलवडी | दि. ०९ एप्रिल २०२३

भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सर्व गावामध्ये सण, उत्सव,जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात त्या अनुषंगाने सर्व समाजामध्ये एकोपा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततामय वातावरणात सण,उत्सव,जयंती साजरे करावेत. यासाठी सर्वांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाण्याचे सा.पो. नि. नितीन सावंत यांनी केले आहे.


येणाऱ्या काळातील 'सण-उत्सव, जयंती हे अधिक चांगल्या पद्धतीने साजरे व्हावेत. या उद्देशाने शांतता समितीची बैठक भिलवडी पोलीस ठाणे याठिकाणी सा.पो. नि. नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.०८ एप्रिल रोजी घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना म्हणाले की, सण-उत्सव व महापुरुषांच्या जयंती काळात सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यामध्ये भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सर्वच गावांनी नेहमी अग्रेसर राहण्याचा मान मिळविला असून येथील नागरिक नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.


यावेळी बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेऊन पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेणार आहे. भिलवडी पोलीस या सण-उत्सव,जयंती कालावधीत अधिक सक्रीय राहून कामकाज करतील, शांतता भंग करून कायदा हातात घेणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकावर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशारा हि सा.पो.नि.नितीन सावंत यांनी दिला आहे.




आयोजकांनी विद्युत रोषणाई करतांना विजेमुळे दूर्घटना होणार नाही याची प्रतिबंधात्मक व्यवस्था ठेवावी. मिरवणुकीमध्ये वाहतूकीची कोंडी होणार नाही, याकरीता योग्य नियोजन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मिडियातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवून शांतता बिघडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्याची खात्री केल्याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका.अशी घटना घडल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधावा. पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार आहे. मात्र, सर्व सुजाण व उत्सवप्रेमी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सर्व गावातील पोलीस पाटील , विविध मंडळातील पदाधिकारी-कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆