BANNER

The Janshakti News

मोफत आरोग्य शिबीरामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे योग्य वेळी योग्य निदान....ॲड दिपक लाड

कुंडल ता.पलूस  येथे डॉ पवार हॉस्पीटल यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



======================================
======================================

कुंडल | दि.26 एप्रिल 2023
-----------------------------------------------------------------

 कुंडल ता.पलूस  येथे डॉ पवार हॉस्पीटल यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरात नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुंडल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ पवार हॉस्पिटलवतीने महात्मा फुले जन आरोग्य, व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते,

१०० चे वर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डॉ पवार हॉस्पिटल चे मुख्य डॉक्टर सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ अमोल पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ अक्षय पाटील, रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे ॲड दिपक लाड हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी ॲड दिपक लाड म्हणाले ग्रामीण शेतकरी कुटुंबातील महिला-पुरुषांचे शेती कामाच्या व्यापात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते,अनेक वेळा तज्ञ डॉक्टर यांची ग्रामीण भागात उपलब्धता नसल्याने रुग्णांचे योग्य वेळी योग्य निदान न झाल्याने अनेक आजार पुढे बळावून रुग्णांचे स्वास्थ धोक्यात आणते.या पार्श्वभूमीवर कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पावर हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित केलेले मोफत आरोग्य शिबीर हे रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे असे मनोगत रणसंग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड दिपक लाड यांनी व्यक्त केले.

पवार हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर डॉ अमोल पवार म्हणाले जन आरोग्य शिबिरे रुग्णांच्यासाठी नवसंजीवनी ठरत आहेत, 
डॉ पवार हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिटल  २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रुग्णांसाठी जास्तीत जास्त सवलतीच्या योजना राबवल्या आहेत, पवार रुग्णालयाच्या वतीने आजवर सामाजिक बांधिलकी जपत डॉ पवार हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो गरीब रुग्णांना जास्तीत जास्त लाभ मिळवून दिल्याचे डॉ अमोल पवार सांगितले.. आरोग्य शिबीराच्या माध्यमातून एकाच वेळी सहजरीत्या गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता येते गावातील लोकांचे आशीर्वाद हेच आमचे डॉक्टर होण्याचे समाधान आहे, असे डॉ अमोल पवार यांनी उद्घाटन प्रसंगी  सांगितले.

कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकिय अधिकारी डॉ अक्षय पाटील म्हणाले  डॉ पवार हॉस्पीटल चा आदर्श घेऊन इतर हॉस्पीटलनी  नागरिकांसाठी वेळोवेळी आरोग्य मार्गदर्शन शिबीर आयोजित केल्यास त्याचा चांगला फायदा नागरिकांना होईल व त्यांना आपल्या प्रकृतीची काळजी घेता येईल, असे डॉ अक्षय पाटील म्हणाले.

 आजच्या धकाधकीच्या जीवनात नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप व नियंत्रण ठेवल्यास आजारांवर मात करता येईल, रुग्ण व नागरिकांना सल्ला देताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय पाटील यांनी सांगितले. 




यावेळी डॉ मनोज सावल , डॉ सुशांत पाटील, प्रा आरोग्य केंद्र कुंडल चे आरोग्य सहाय्यक हुबाले, टी.डी कांबळे व्ही .आर घडलिंह मॅडम सुजाता पाटील मॅडम,चित्रा सुपने मॅडम, एन .ए मुके मॅडम एस जे राजमाने मॅडम एस एस गायकवाड मॅडम शिकलगार मॅडम यांच्यासह डॉ पवार हॉस्पीटल चे विकास कांबळे व स्टाफ
रणसंग्राम चे अमोल कांबळे, हनीफ शेख, संभाजी सोळवंडे व अशा सेवीका स्वाती खारगे, अर्चना कोळी व नागरिक उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆