=====================================
=====================================
भिलवडी | दि. १० एप्रिल २०२३
व्यापारी संघटना भिलवडी यांनी जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी यांच्या सहकार्याने अन्न सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांसाठी Fostag ट्रेनिंग पार पाडले. जायन्ट्स वेलफेअर फाउंडेशनचे NCF मेंबर व चितळे डेअरीचे उद्योजक श्री. मकरंद चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील, अध्यक्ष सुबोध वाळवेकर, उपाध्यक्ष रणजीत अशोक पाटील, इम्रान जमादार , सचिव राजू तेली वरिष्ठ जाणते व्यापारी अशोक जाधव, दिलीप कोरे त्याचप्रमाणे संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार व्यापाऱ्यांसाठी हे ट्रेनिंग अनिवार्य केलेले आहे, हाच हेतु लक्षात घेऊन व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक ज्ञानामध्ये वृद्धी करण्यासाठी तसेच कायदेशीर बाबींची माहिती देण्यासाठी या शिबिराचे नियोजन केले होते.
या शिबिरासाठी EP infoways कंपनीचे श्री रमेश कुंभार सर, ट्रेनिंग ऑफिसर सौ. वनिता नलवडे यांनी मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रम कै. बाबासाहेब चितळे मेमोरियल ट्रस्ट, शिवाजीनगर माळवाडी येथे पार पडला. यासाठी भिलवडी व परिसरातील सर्व व्यापाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆