वंचित बहुजन आघाडीचे आवाहन...
=====================================
भिलवडी | दि. २६ मार्च २०२३
-----------------------------------------------------
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या अंकलखोप येथील पांडुरंग मधुकर सुर्यवंशी याला भिलवडी पोलिसांनी अटक केली आहे पांडुरंग सुर्यवंशी याच्यावर भारतीय दंड संहिता २९५-A व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ -३(१) (पाच) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिलवडी पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पांडुरंग सुर्यवंशी याला ५ दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तरी सर्व आंबेडकरी अनुयायांनी मुस्लिम व इतर बहुजन बांधवांनी अंकळखोप, भिलवडी, माळवाडी या परिसरात शांतता राखून सर्व व्यवहार सुरळीत करावेत असे आवाहन
ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडीने केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंकलखोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्थळास भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. याचवेळी भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.नितीन सावंत साहेब यांची प्रत्यक्षात भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल तसेच आरोपी वर केलेली कारवाई बाबतीत सखोल चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या अंकलखोप येथील पांडुरंग मधुकर सुर्यवंशी याला बोलायला लावणारा धनी कोण आहेत याचा शोध ताबडतोब लावण्यात यावा असे सांगण्यात आले.
यावेळी, वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा संघटक संजय कांबळे, तसेच वंचित बहुजन माथाडी युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा सदस्य किशोर आढाव,
जिल्हा प्रशिध्दी प्रमुख ऋषिकेश माने, मिरज तालुका महासचिव सागर आठवले यांच्या बरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆