BANNER

The Janshakti News

श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी येणारा आर्थिक अडथळा दूर करणेबाबत मा.कामगार मंत्री डाॅ.सुरेश (भाऊ) खाडे यांना निवेदन..



=====================================
=====================================

सांगली दि.०६ : वैद्यकीय शिक्षणातील नर्सिंग कोर्सेस,डि.-फार्मसी, बी.फार्मसी ही सुध्दा E-05 या योजनेत समाविष्ट करून शैक्षणिक लाभाची रक्कमेत वाढ होवून मिळणे बाबत सेवक बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटनेकडून मा.कामगार मंत्री डाॅ.सुरेश (भाऊ) खाडे यांना, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.  त्यावेळेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी प्रामुख्याने उपस्थित होते,म्हणाले कि
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती च्या माध्यमातून खुप मोठी आर्थिक मदत होत असुन यामुळे बांधकाम कामगारांची मुले सुध्दा उच्च व चांगल्या दर्जाचे शिक्षण घेत आहेत.बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे कल्याण होते आहे. तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय कांबळे यांनी मंडळ व शासनाने बांधकाम कामगारांच्या साठी कल्याणकारी अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत असल्याने  सर्वप्रथम आपले व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई. तसेच मा.सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांचे आणि महाराष्ट्र शासनाचे आम्ही सेवक संघटित व असंघटित बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य मार्फत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने  मनःपूर्वक आभार मानून  संघटनेच्या मार्फत निवेदना द्वारे मागणी करण्यात आली की,
 सध्यास्थिती मध्ये महागाईचे सर्वच ठिकाणी परीणाम होत असुन शिक्षण क्षेत्रही यापासून सुटलेले नाही विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी व्दिधा मनस्थितीत आहेत,वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे पण श्रमिक बांधकाम कामगारांची अर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्याने दिवसभरात काम केल्यानंतरच त्यांच्या कुटुंबीयांना एक वेळचे जेवण मिळण्यासाठी तेव्हा कोठेतरी चुल पेटवली जाते. काही वेळेस तर एक वेळचे जेवण मिळणे सुध्दा खुपच कठीण झाले आहे.कारण रोजच्या रोज काम मिळेलच याची काहीच श्वासती नसते.अशा खडतर परिस्थितीत मुलांना उच्च व चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी खूपच परिश्रम घ्यावे लागत आहे. प्रत्येक गरीब व कठीण परिस्थितीत जगत असणाऱ्या आई वडीलांना असे वाटते की आपणास जो त्रास, कष्ट, दुःख यातना भोगायला लागत आहेत. आपल्या मुलांच्या वाटेला असे हाल येऊ नयेत म्हणून सतत काबाड कष्ट करत असतात, मनामध्ये कितीही तणाव किंवा कितीही आजारी असल्यास अश्या परिस्थितीत सुध्दा स्वताचे आरोग्याची काळजी न करता   मुलांच्या भविष्या बाबत विचार करत असतात. वेळ प्रसंगी खाजगी सावकार व खाजगी फायनान्स कंपनी कडून मोठ्या व्याजदरात कर्ज घेऊन मुलांना चांगले व समाजाच्या हिताचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असतात. या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासनाने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून अर्थ सहाय्य केले जात आहे परंतु वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नर्सिंग,B फार्मसी, D फार्मसी मध्ये शिक्षण घेण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून दिले जाणारे अर्थ सहाय्य अपुरे असल्याने  शिक्षण पुर्ण करणे खुपच कठीण होत आहे. विषेश करुन नर्सिंग कोर्सेसचा खर्च लाखाहूनही जास्तच आहे. प्रत्येक वर्षाला महाविद्यालय वार्षिक शैक्षणिक फी,भाड्याने राहणे,जेवण खर्च,परीक्षा फी,इतर खर्च असे जवळपास सरासरी दिड ते दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे बांधकाम कामगांराचे मुले - मुली वैद्यकीय शिक्षणापासून वंचित रहात आहेत. परिणामी त्यांच्या मुलांना शिक्षण अर्धवट सोडून परत आपल्या आई वडिलांच्या प्रमाणे डोक्यावर पाटी घेऊन काबाड कष्ट करावे लागत आहे. पैसे अभावी शिक्षण पूर्ण होत नसल्याने नैराश्य होऊन तरूण पिढी दारूच्या व्यसनाच्या आधीन जात आहेत. महागाई मध्ये घरखर्च भागत नसल्यामुळेच त्यांचे कुटुंब तणावाखाली जीवन जगत आहेत.
त्यामुळे आम्ही आमच्या सेवक बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटनेकडून आपणास विनंती करत आहोत कि नर्सिंग कोर्सेस,डि. फार्मसी बी.फार्मसी ही सुध्दा E05 मध्ये म्हणजे एक लाख रूपये मध्ये समाविष्ट करून मुलांचे वैद्यकीय शिक्षण घेण्यास येणाऱ्या आर्थिक अडथळा दुर करून त्यांच्या समृध्द जीवनाचे आधार व्हावे तसेच वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठबळ मिळावे असे निवेदन द्वारे आपणास विनंती करत आहोत.
 तरी आपण सर्व बाबींचा विचार करून तसेच कामगारांच्या मुलांची होत असलेली शैक्षणिक अडचणी व गैरसोय लक्षात घेऊन पुढील उचित कार्यवाही साठी आदेशीत करावे असे विनंती करत आहोत. तसेच गोरगरीब श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या शुभेच्छा घ्याव्यात.


त्यावेळेस सोबत आरोग्य विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, बांधकाम विभागाचे जिल्हाध्यक्ष विज्ञान लोंढे, जिल्हा महासचिव दिपालीताई वाघमारे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र खांडेकर,विशेष उपस्थितीत वंचित बहुजन माथाडी व ट्रान्सपोर्ट जनरल युनियन चे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे,असलम मुल्ला, सिध्दार्थ कांबळे,बंदेनवाज राजरतन,यल्लाप्पा बनसोडे, संदिप कांबळे, सुभाष पाटील, दिलीप गाडे, सुरेश आठवले, डॉ. रविंद्र विभुते, विक्रांत गायकवाड,आनंदा गाडे,संगाप्पा शिंदे, युवराज कांबळे, विक्रांत सादरे यांच्या बरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆



◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆