BANNER

The Janshakti News

दवाखान्यातून तीन लाख ३० हजारांची रोकड दिवसा लंपास करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केली अटक.. सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई..



==============================
=====================================

सांगली | दि. १८ मार्च २०२३
-----------------------------------------------------------------



तुंग ता. मिरज येथील संजीवनी क्लिनिक येथून तीन लाख ३० हजारांची रोकड दिवसा लंपास करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरीतील 2 लाख 68 हजारांची रोकड, चोरीसाठी वापरलेले साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली.

रोहित बाजीराव आखळे (वय ३२, रा. केदारवाडी, ता. वाळवा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तुंग येथील डॉ. अभिनंदन आप्पासो वाडकर यांच्या  संजीवनी क्लिनिक येथून दि. 10 मार्च 2023 रोजी 3 लाख 30 हजारांची रोकड चोरट्याने भरदिवसा लंपास केली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील चोरट्यांना शोधून त्यांना अटक करण्याचे आदेश सांगली ग्रामीण पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी एक खास पथक तयार केले होते.
तुंग येथील दवाखान्यातील चोरी रोहित आखळे याने केल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर त्याला गुरुवारी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने तुंग येथील डॉ. अभिनंदन आप्पासो वाडकर यांच्या  संजीवनी क्लिनिक मधून रोकड चोरल्याची कबुली दिली. तसेच इस्लामपूर येथेही अशाच प्रकारची चोरी केल्याचीही त्याने कबुली दिली. त्याच्याकडून दोन्ही चोरीतील रोकड तसेच चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. रोहित आखळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली, सातारा, रायगड, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात २२ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 
सदरची कारवाई मा. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, सांगली व श्री अजित टिके उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, सांगली यांचे मार्गदर्शनाखाली 




श्री शिवाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक, किरण मगदूम, पोलीस उप-निरीक्षक, सपोफौ बाळकृष्ण गायकवाड, पोहेकाँ  रमेश काळी , पोहेकाँ संतोष माने, पोना सचिन मोरे, पोहेकॉ अरुण पाटील , ने इस्लामपुर पोलीस ठाणे, पोहेकाँ संदिप पाटील शिराळा पो.ठाणे , पोशि स्वप्नील नायकवडे, ने सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे. 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆