======================================
======================================
भिलवडी | दि. 23 फेब्रुवारी 2023
--------------------------------------------------------------------
भिलवडी (ता.पलूस) येथील मे.बी.जी.चितळे डेअरीचे संचालक उद्योजक मकरंद चितळे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस एक लाख रुपयांची देणगी दिली.
आपल्या जन्मदिवसाचे औचित्य साधून विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यास देणगी देण्याची स्व.काकासाहेब चितळे यांनी निर्माण केलेली परंपरा चितळे परिवाराने सातत्याने सुरू ठेवली आहे.शिक्षण क्षेत्रात सेवाभावी पद्धतीने
कार्यरत असणाऱ्या भिलवडी शिक्षण संस्थेस अत्यावश्यक अशा भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी या देणगीचा उपयोग करण्यात यावा असे मनोगत
मकरंद चितळे यांनी व्यक्त केले.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी या देणगीचा स्वीकार केला.यावेळी सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी चे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी,सहसचिव के. डी.पाटील उपस्थित होते.या देणगी बद्दल मकरंद चितळे यांचा भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मकरंद चितळे यांचे कडून देणगीचा धनादेश स्वीकारताना मानसिंग हाके,संजय कुलकर्णी,के.डी.पाटील आदी.
त्याचबरोबर मकरंद चितळे यांनी सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेस देखील एक लाख (रु.१००,०००) रुपयांची देणगी दिली आहे.
ते वाचनालयाचे आजिव सभासद आहेत.
या बहुमोल देणगी बद्दल वाचनालयाच्या वतीनेग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला विश्वस्त जी.जी.पाटील यांनी देणगीचा धनादेश स्विकारला यावेळी अध्यक्ष श्री .गिरीश चितळे कार्यवाह सुभाष कवडे,संचालक डी.आर.कदम,ज.कृ.केळकर ,हणमंत डिसले व महादेव जोशी सर्व सेवक व वाचक उपस्थित होते.
या देणगीचा विनियोग निश्चितपणे वाचनालयाच्या चौफेर प्रगतीसाठी केला जाईल अशी ग्वाही कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिली.
यावेळी मा.मकरंद चितळे यांचे हस्ते राष्ट्र संत गाडगेबाबा यांचे जयंती निमित्त गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणेत आले.
मा.गिरीश चितळे यांनी गाडगेबाबांच्या चरिञातीलकाही प्रसंग सांगितले याचवेळी दिशा फाॕऊन्डेशन भिलवडीचे श्री .सचिन देसाई यांनी वाचनालयास बालवाचकांचे वीस पुस्तके भेट दिली आहे.या बद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.ज.कृ.केळकर यांनी आभार मानले.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆