BANNER

The Janshakti News

शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठानची मानाची शिवजयंती उत्साहात साजरी...छत्रपतींचा जन्म सोहळा पाहण्यासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी..



=====================================
=====================================

कुंडल | दि.२१ फेब्रुवारी २०२३
--------------------------------------------------------------------

कुंडल (ता पलूस) येथील शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठानची छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड यांच्या पुढाकाराने शेकडो महिलांनी छत्रपतींची महाआरती केली आणि पाच महिलांनी त्यांचे स्व लिखित पाळणे सादर केले. हा छत्रपतींचा जन्म सोहळा पाहण्यासाठी परिसरातून हजारो नागरिक, महिला उपस्थित होत्या.


कुंडल परिसरात शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठाणची शिवजयंती मानाची समजली जाते, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराजांचा 60 फूट लांबीचा प्रशस्त शामियाना उभा केला आहे, यंदा किल्ले सिंधुदुर्ग येथून शिवज्योत आणण्यात आली होती. संपूर्ण गावात विद्युत रोशनाई करून पूर्ण गाव भगवे केल्याने शिवजयंतीचा उत्साह तरुणांसह महिला आणि अबाल वृद्धांमध्ये ही होता.



दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजता महाराजांची सुवाद्य संगीतात भव्य मिरवणुक काढण्यात आली.   रांगोळी, आतिषबाजी, हलगी, घोडे, ढोल, जिवंत देखावा आणि शिवरथ हे या मिरवणुकीचे खास आकर्षण होते.
या मिरवणुकीत आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद गट नेते शरद लाड, राजेंद्र लाड, रणजित लाड, अमरदीप लाड, विक्रांत लाड यांचेसह हजारो शिवभक्तांनी सहभाग घेतला.

◆●◆●◆●●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●




◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆