BANNER

The Janshakti News

■ निराधारांचा आधार देणारे "शरद आत्मनिर्भर अभियान" भविष्यात एकही कुटुंब निराधार राहणार नाही ■ आमदार अरुणअण्णा लाड.
======================================
======================================

कुंडल | दि. २४ जानेवारी २०२३

पलूस-कडेगाव तालुक्यातिल प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर होईल यासाठी "शरद आत्मनिर्भर अभियान" तत्पर असेल त्यादृष्टीने आज पहिले पाऊल उचलत आहे असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले.

ते कुंडल (ता पलूस) येथे शरद फाउंडेशन अंतर्गत " शरद आत्मनिर्भर योजना"अंतर्गत निराधार कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, शरद फाउंडेशनच्या अध्यक्षा धनश्रीताई लाड, डी.एस.देशमुख, सुरेश शिंगटे आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार लाड म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकाला केलेली मदत म्हणजे देश घडवण्यासाठी उचलले पाऊल आहे. लाभार्त्यांच्या पावलाला आम्ही ताकद देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प सोडला आहे. भविष्यात या दोन तालुक्यात एकही कुटुंब निराधार राहणार नाही अशी शाश्वती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी शरद लाड म्हणाले, ज्या नागरिकांना लाभ मिळाला आहे त्यातून स्वतःचे कुटुंब सावरावे यातून स्वतःबरोबरच समाजाचीही उन्नती घडवावी.

यावेळी तानाजी जाधव, रमेश एडके, वैभव पवार, विराज पवार, संभाजी बाबर, संभाजी पाटील, प्रशांत पवार, मिनाज मुल्ला, प्रणिता पाटील, प्रवीण करंडे, अतुल नागरे, पूजा लाड, दीपक मदने, विनायक महाडिक यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही कुटुंबातील महिला सक्षम झाली तर पूर्ण कुटुंब सक्षम होतं हे ओळखून निराधार महिलांना शरद फाउंडेशन अंतर्गत "शरद आत्मनिर्भर अभियानातून मदत दिली जात आहे यातून ते कुटुंब आत्मनिर्भर करणे हा एकमेव उद्देश आहे.... धनश्रीताई लाड, अध्यक्षा, शरद फाउंडेशन.

 "शरद आत्मनिर्भर अभियान" अंतर्गत कडेगाव तालुक्यातील लाभार्त्यांना मदत सुपुर्द करताना आमदार अरुणअण्णा लाड, शरद लाड, धनश्रीताई लाड, डी.एस.देशमुख,सुरेश शिंगटे, महेंद्र करांडे आदी..

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆