BANNER

The Janshakti News

सामाजिक दातृत्वाचा दौंडे परिवाराचा आदर्श समाजासाठी आशादायी.. किरण (तात्या) लाड




=====================================
=====================================

कुंडल | दि. २४ जानेवारी २०२३

कुंडल (ता.पलूस ) सामाजिक दातृत्वाचा  दौंडे परिवाराचा आदर्श  समाजासाठी  आशादायी  आहे असे प्रतिपादन क्रांती दूध संघाचे अध्यक्ष  किरण तात्या लाड यांनी केले.

 सिंधुछाया  चॅरिटेबल   ट्रस्ट इचलकरंजी  यांचेवतीने  कुंडल येथील  प्रतिनिधी हायस्कूल ला  11 संगणक संच भेट म्हणून देण्यात आले .कुंडल येथील माजी ग्रामपंचायत सदस्य स्वर्गीय सिंधुताई दौंडे  यांच्या स्मरणार्थ त्यांचे  नातू सावन चंद्रकांत  दवंडे, सोहन दौंडे   व सुपुत्र अनिल नारायण  दौंडे  व  कुटुंबीयांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरून  श्री  लाड बोलत होते  , श्री  सत्यविजय बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब बापू पवार, कुंडल काँग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव पापा पवार  प्रमुख उपस्थित होते. 
 
किरण तात्या लाड म्हणाले ,कुंडल येथील दौंडे परिवार हे आदर्श व त्यागी कुटुंब आहे .क्रांतिअग्रणी जी.डी. बापूंच्या अनेक सामाजिक आंदोलनात सिंधुताई यांचा सहभाग होता.त्यांचे नातू  सावन दवंडे  यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत आपले उच्च  शिक्षण पूर्ण केले.  विद्यार्थ्यांना करिअरसाठी  संगणकाचे महत्त्व  ओळखून  अमेरिकेत असूनही त्यांनी  विद्यार्थ्यांसाठी दिलेली संगणकाची भेट  ही अमूल्य आहे. दौंडे परिवाराची मदतीची तळमळ  मदत निश्चित समाजासाठी आदर्शवत आहे.
 
बाळासाहेब पवार म्हणाले, दौंडे  परिवाराचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून एक आदर्श निर्माण करणार आहे. 

सोहन दौंडे म्हणाले , माझे बंधू सावन यांना 
त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांना  संगणकाची  त्यांना गरज होती  त्यावेळी त्यांनी एका पतसंस्थेतून कर्ज काढून संगणक घेतला   त्याचमुळे विद्यार्थ्यांना करिअरसाठी  संगणकाचे महत्त्व  ओळखून  ही मदत केली आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके ,  कॉम्रेड सुभाष पवार, जगन्नाथ आवटे, रघुनाथ भिसे, विलास मासाळ , गोविंद डुबल , कुसुमताई दौंडे , सुमन गायकवाड  सूर्यकांत बुचडे, संजय आमणे , संगीता आमणे , संध्या दौंडे  ,शर्वरी दौंडे , सुलोचना तारळेकर , शामला खारगे , शशिकला दौंडे , सुदर्शनी  दौंडे, गौरी दौंडे , आशुतोष दौंडे , पञकार  धनंजय दौंडे , प्रा.संदेश दौंडे , संजय गोरड  आदि उपस्थित होते.

  यावेळी  सर्जेराव पवार ,सुभाष पवार ,कुंडलिक एडके यांची भाषणे झाली .वैभव लाड यांनी स्वागत केले.श्री . लोकरे सूत्रसंचालन केले. संग्राम लाड यांनी आभार मानले.

नानापाटील विद्यार्थी वसतिगृहातील 225 मुलांना खास पद्धतीने भोजन देण्याचा उपक्रम ही दौंडे परिवाराने राबविला.


कुंडल  येथील प्रतिनिधी हायस्कूल ला संगणक संच भेट देताना श्रीमती संध्या दौंडे व दौंडे परिवार सोबत किरण लाड ,बाळासाहेब पवार ,सर्जेराव पवार  आदी..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆