BANNER

The Janshakti News

राष्ट्रवादी कुंडलपूरती नाही तर ती घराघरात पोहोचली आहे टीका करणाऱ्यांना नागरिकांनीच मारली चपराक : कुंडलमध्ये राष्ट्रवादीच्या "संघर्ष योद्धा" मध्ये हुंकार

=====================================
=====================================

कुंडल | दि. 08 जानेवारी 2023

राष्ट्रवादी फक्त कुंडलमध्येच आहे म्हणणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी दाखवून दिले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पलूस तालुक्यातील प्रत्येक गावात आहे यामुळे पळपुट्या लोकांना कृतीतून मतदारांनी चपराक दिली आहे.
असा हुंकार कुंडल (ता पलूस) येथे
 "संघर्ष योद्धा" या कार्यक्रमात उठला.
 पलूस तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लढलेल्या आणि जिंकलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा कार्यक्रम येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड समाधीस्थळी पार पडला यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, पलूस तालुका पक्ष निरीक्षक विश्वास पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, ज्यांना पक्षाने ताकद दिली ते पक्षातून पळून गेले पण आपण न डगमगता राष्ट्रवादी पक्ष सक्षमणे उभा केला. सामान्य नागरिकांचे काम ग्रामपंचायत स्थरापर्यंतच असतात त्यामुळे नेहमी कामात रहा. या निवडणुकीतून हे लक्षात आले की तालुक्यात मतदानाचा टक्का वाढला आहे,भविष्यात अजून काम करून राष्ट्रवादीची ताकद वाढवन्याचे आवाहन त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिले.

यावेळी शरद लाड म्हणाले, जे निवडून आलेत त्यांनी कामात राहिलेच पाहिजे पण जे निवडून आले नाहीत त्यांनी ही कामात राहिले पाहिजे यामुळे आपला गट तयार होईल. पुढच्या निवडणुकीत नागरिकांमधून तुमची उमेदवार म्हणून मागणी झाली पाहिजे असे काम करा त्यासाठी लागेल ती प्रशासकीय यंत्रणा आम्ही पुरवू. महिला उमेदवारांनी सक्षमरीत्या काम करावे, राजकारण त्या त्या वेळी करू, पण समाजकारनात सातत्य ठेवा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

पलूस कडेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे याचे सर्व श्रेय आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे,  या तालुक्यात पक्षाला भविष्य चांगले आहे.निष्ठावंत कार्यकर्ता तयार झाला तर भविष्यात शरद लाड यांना त्याची ताकद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वागत इंद्रजित पवार यांनी केले, प्रास्ताविक दीपक मदने यांनी केले, तर आभार विनायक महाडिक यांनी मानले.

जिल्हा परिषद सदस्य  नितीन नवले, तालुकाध्यक्ष मोहन पाटील, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, पोपट संकपाळ, डी.एस.देशमुख, ऍड सतीश चौगुले, दिलीप पाटील, जयप्रकाश साळुंखे, पूजा लाड यांचेसह पलूस तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


पलूस तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या यशाच्या शिलेदारांसह आमदार अरुणअण्णा लाड, शरद लाड, डी एस देशमुख, विश्वास पाटील आदि.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆