BANNER

The Janshakti News

भिलवडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कैलास कोडग यांची सांगली पोलीस मुख्यालयामध्ये बदली.. भिलवडी पोलीस ठाण्याचा पदभार सहा.पो.नि. नितीन सावंत यांनी स्वीकारला..======================================
======================================


भिलवडी | दि. 07 जानेवारी 2023

        भिलवडी (ता.पलूस) पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नितीन सावंत यांनी पदभार स्वीकारला तर भिलवडी चे तत्कालीन पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी सांगली मुख्यालय येथे एस पी बसवराज तेली यांचे रीडर वन म्हणून पदभार स्वीकारला आहे.  भिलवडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कैलास कोडक यांनी महापूर, कोरोना काळामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर भिलवडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आपल्या धाडसी वृत्तीने आवळल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण फार कमी झाले आहे. 
 नूतन पोलीस निरीक्षक नितीन सावंत  यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी ही मिरज  शहर पोलीस ठाण्यामध्ये आपली धडाडीवृत्ती दाखवीत पोलीस दलात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. गुंतागुंतीचे अनेक गुन्हे त्यांनी आपल्या धाडसी वृत्तीने सिद्ध केले आहेत. त्यांच्या धाडसी व कायदा सुव्यवस्था जपून कृष्णाकाठला सर्वसामान्य कुटुंबांना न्याय मिळेल अशी चर्चा कृष्णा काठावर होत आहे. त्यांचे स्वागत भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीने केले तर कैलास कोडग यांना नोरोप देण्यात आला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सावंत ,व कोडग चांगले काम करतील अशी अशा पोलीस दलात आहे.            सहा.पोलीस निरीक्षक नितीन सावंत 
            सहा.पोलीस निरीक्षक कैलास कोडग

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆