BANNER

The Janshakti News

समाजसेवक शाम पवार एक अद्वितीय व्यक्तिमत्व : दिगंबर साळुंखे समर्थ संस्थेमार्फत श्याम पवार यांचा सत्कार संपन्न..======================================
======================================

सांगोला | दि. 06 जानेवारी 2023

समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था वाटंबरे ता.सांगोला यांच्या वतीने डोंगरवाचे शाम पवार यांचा सांगोला येथील 'आपुलकी प्रतिष्ठान सांगोला' या संस्थेमार्फत  समाजसेवा प्रेरणा पुरस्काराणे सन्मानित करण्यात आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी पवार यांच्या कार्याची माहिती देताना म्हटले की श्याम पवार यांनी महात्मा फुले समाजसेवी संस्था करमाळा या संस्थेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, महिला समस्या, दुर्लक्षित घटक यावरती सामाजिक कार्याची सुरवात केली, यानंतर उत्कर्ष शिक्षण व समाजसेवी संस्था स्थापन करून संस्थेच्या माध्यमातून  अपंग लोकांना मोफत कृत्रिम हात-पाय,खुर्ची, आधार काठी इ.साहीत्य पुरवठा केला,स्वच्छता अभियान, महिला मेळावे, आरोग्य शिबीर, रोजगार हमी, रोजगार जागृती शाखा,
गावांमध्ये महिलांचे संघटन करून दारूबंदी ,स्वच्छ व व्यसनमुक्त गाव चळवळ उभी केली,सफाई कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य केले, चार हृदरोग्यांना मदतीचा हात देवून त्यांना नवीन जीवदान दिले,गावामध्ये  शिवजयंती पासून वेगवेगळे सण उत्सव साजरे केले गेले.क्रीडा क्षेत्रात क्रिकेट पासून ते वेगवेगळ्या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिले. त्याच बरोबर गावाच्या विकासासाठी व प्रगतीसाठी वेळोवेळी संघर्ष व आंदोलने केली. यामध्ये डोंगरगाव रेल्वे स्टेशन ,रेल्वेचा थांबा होणेसाठी इतकेच नाही रेल्वे स्टेशन चे नामकरण 'म्हसोबा डोंगरगाव' होण्यामध्ये शाम पवार यांची महत्वाची भूमिका बजावली. पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या 'बचपन बचाओ' या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेतला.राजकीय पक्षांचे निरीक्षक म्हणून वेगवेगळ्या राज्यात काम केले. कोरो संस्थेच्या माध्यमातून पाण्यावरती केलेली काम ही उल्लेखनीय आहे. याचा विचार करता पवार हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व असून त्यांचा केलेला गौरव हा विशेष भूषणावह आहे.


       यावेळी वाटंबरे गावचे थोर समाजसेवक महादेव बापू पवार,चेअरमन भाग्यवन पवार,उद्योजक मल्हारी पवार,नंदू गायकवाड,शिवाजी अलदार,भारत पवार,समर्थ संस्थेचे उपाध्यक्ष महेश दत्तू,सचिव प्रमिला साळुंखे,खजिनदार मेघश्याम सुरवसे,संचालक इकबाल पाटील,शरदचंद्र पवार,लता पाटील यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆