BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला देशातील " सर्वोकृष्ठ सहकारी साखर कारखाना " पुरस्कार जाहीर..




=====================================
=====================================

कुंडल | दि. १४ जानेवारी २०२३

कुंडल (ता.पलूस) : क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली यांचा देशातील " सर्वोकृष्ठ सहकारी साखर कारखाना " हा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे 21 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात प्रदान करणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे प्रमुख उपस्थित होते.

या पुरस्काराबरोबरच वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट कडून कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोकृष्ठ पर्यावरण पुरस्कार ही कारखान्याला प्रदान केला जाणार आहे तसेच वैयक्तिक विभागातून उक्तृष्ठ आसवणी व्यवस्थापक पुरस्कार कारखान्याचे आसवणी व्यवस्थापक अनिल शिंदे यांनाही दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार लाड म्हणाले, देश पातळीवरील हा पुरस्कार 2021-22 सालात उच्च साखर उतारा विभागात देशपातळीवरील हा पुरस्कार कारखान्याने केलेल्या कार्यक्षमरित्त्या केलेले तांत्रिक कार्य, काटेकोर आर्थिक नियोजन आणि ऊस विकासात केलेल्या भरीव कामामुळे मिळाला आहे.

तसेच, कारखान्याने मागील गळीत हंगामात साखरेची गुणवत्ता चांगली ठेवत पाणी, वाफ आणि वीज यांची बचत करून प्रदूषण नियंत्रित केले, पाण्याचा योग्य वापर करून सांडपाणी उत्सर्जन कमी केले, पुरेसे मनुष्यबळ वापरत पर्यावरण व्यवस्थापन केले, औद्योगिक सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर, कार्यक्षेत्रामध्ये पीक फेरपालट व सेंद्रिय कर्ब वाढीसाठी काटेकोर नियोजन, कार्यक्षेत्रात सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन दिल्याने कारखान्याला सर्वोकृष्ठ पर्यावरण पुरस्कार जाहीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले वेळेत देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याही विश्वासास पात्र ठरला आहे. तसेच बँकांची देणी वेळेत दिल्याने देय व्याजात भरीव बचत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

                      आमदार मा.अरुण लाड

यावेळी सचिव आप्पासाहेब कोरे,
मुख्य अभियंता आशिष चव्हाण, चीफ केमिस्ट किरण पाटील, लेबर ऑफिसर वीरेंद्र देशमुख, स्थापत्य अभियंता महादेव माने, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, पर्यावरण अधिकारी सागर पाटील, यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆