BANNER

The Janshakti News

इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूलचा रंगोत्सव पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न..
====================================
====================================

भिलवडी | दि. १४ जानेवारी २०२३

भिलवडी (ता.पलूस) शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूलमध्ये नुकताच रंगोत्सव या स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई या संस्थेमार्फत लहान गट व 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. 
यामध्ये रंगभरण,  ठसेकाम, भेटकार्ड,  कोलाज काम, हस्ताक्षर, रेखाटन स्पर्धा, कार्टून स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या विविध स्पर्धेसाठी आमच्या विद्यालयातील 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये जवळजवळ 75 हुन अधिक विद्यार्थ्यांना विविध बक्षीसे व सन्मानचिन्ह स्वरूपात पारितोषिके देण्यात आली असून
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. लीना (वहिनी) चितळे या उपस्थित होत्या.  तसेच संस्थेचे सदस्य मा. श्री. गिरीश चितळे  मा. श्री. केळकर सर, तसेच इंग्लिश मिडीयम विभागाचे प्रमुख श्री. के.डी.पाटील  उपस्थित होते. 


सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये संपादन केलेल्या यशाचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

 या स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षक श्री. गजानन चव्हाण , सौ. संगीता चौगुले व सौ. सुप्रिया पवार यांचे मार्गदर्शन लाभले. 
हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यात उत्साहात पार पडला.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆