BANNER

The Janshakti News

राज्यातील साखर कारखान्यांची फसवणूक करणाऱ्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाईसाठी प्रयत्न करू... यापुढे ऊस तोडणीसाठी नोंदनींकृत मुकादमांकडूनच व्यवहार केले जातील ......पी.आर.पाटील अध्यक्ष राज्य साखर संघ=====================================
=====================================

कुंडल | दि. ११ जानेवारी २०२३

राज्यातील साखर कारखान्यांची ज्या मुकादमांकडून 622 कोटींची फसवणूक केली आहे. त्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाईसाठी प्रयत्न करू, यापुढे ऊस तोडणीसाठी नोंदनींकृत मुकादमांकडूनच व्यवहार केले जातील अशी ग्वाही राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी दिली.

ते कुंडल (ता पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड,

पी.आर.पाटील म्हणाले, आमदार अरुणअण्णांची नेहमी मागणी होती की अनुदानावर हार्वेस्टर मिळाले तर ऊस तोडणी यंत्रणा सुखकर होईल याबाबत हार्वेस्टरसाठी 25 टक्के अनुदानासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांना यश येईल अशी खात्री व्यक्त केली.

यावेळी आमदार लाड म्हणाले, पी.आर.दादांनी आजवर राजारामबापू कारखान्यात गेली 27 वर्षे एकनिष्ठेने काम केले आहे, कारखानदारीच्या बिकट वेळेत ही सक्षमणे सहकार टिकवला आणि वाढवला. आमदार जयंतराव पाटील यांनी जे उद्योग काढले ते लोकांसाठी काढले, त्यांनी वैयक्तिक घर भरायचे असते तर हे उद्योग खासगी स्वरूपात काढले असते पण तसे केले नाही.

पी.आर.दादांची साखर संघाच्या अध्यक्षपदी निवडीने सामान्य शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे, साखर संघाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, संचालक बाळासाहेब पवार, दादासाहेब मोरे, दिलीप लाड, पोपट संकपाळ, तानाजी जाधव, आप्पासाहेब जाधव, अंकुश यादव, अरविंद कदम, ऍड.सतीश चौगुले, कुंडलिक थोरात, आत्माराम हारुगडे, दिनकर लाड, अशोक पवार, जयप्रकाश साळुंखे, रणजित लाड, ग्रामपंचायत सदस्य किरण लाड, अर्जुन कुंभार यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.


राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांचा सत्कार करताना आमदार अरुणअण्णा लाड.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆https://youtube.com/@thejanshakatinews5707
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆