BANNER

The Janshakti News

इराणी, डवरी समाजाला हक्काची जागा आणि घरकुल द्या अन्यथा जनउद्रेक.. ...ॲड दिपक लाड /अमीर पठाण=====================================
=====================================

 --------ॲड दिपक लाड यांची प्रतिक्रिया------                                
                         व्हिडीओ
                      👇👇👇👇

पलूस | दि. ०५ नोव्हेंबर २०२२

पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन लगत बापूवाडी वसाहतीमधील इराणी व डवरी लोक वस्तीला हक्काची जागा व घरकुल तात्काळ द्या अन्यथा जन उद्रेक अटळ आहे
 अशी संतप्त भावना रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड दिपक लाड .. व बापूवाडी घरकूल संघर्ष समितीचे निमंत्रक सामाजिक कार्यकर्ते अमीर पठाण यांनी आज रामानंदनगर येथील बापूवाडी येथील नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केली.

रामानंदनगर येथील बापूवाडी लोकवस्तीमध्ये 70 वर्षापासून इराणी व डवरी समाजाची अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत..

प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे या लोक वसाहतीकडे लक्ष नाही.
 निवडणूक आली की मतापुरता या लोकांचा वापर केला जातो..

गजबजलेल्या ठिकाणची हि वसाहत दुर्लक्षित का असा आरोप ॲड दिपक लाड यांनी केला आहे.

आजही या लोकांना हक्काची घरे नाहीत या लोकवस्तीमध्ये लोकांना साधे पिण्याचे पाणी मिळत नाही गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते, या लोकांच्या घरामध्ये लाईट नाही, शौचालयाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.. महिलांना तर याचा प्रचंड मोठा त्रास होतो..प्रचंड घाणीचे साम्राज्य असणाऱ्या या वस्तीमध्ये नागरिक वास्तव्य करत आहेत.. 

या वस्तीतच महावितरणचा
 D.P असल्याने नागरिकांच्या जीवितास हा D.P धोकादायक बनला आहे..

मागील दोन दिवसांपूर्वी 
डी.पी शॉर्टसर्किट होऊन पेट घेतल्यामुळे वसाहती मधील नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आगीमुळे बापू वाडी वसाहती मधील एका घराचे छत जळाले आहे. नागरिकांच्या प्रसंगअवधानामुळे आग आटोक्यात आली अन्यथा लोक वस्तीमध्ये हलकल्लोळ झाला असता... वसाहती मधील लोकांच्या जीवावर बेतले असते.

 रामानंदनगर-किर्लोस्करवाडी पलुस-कुंडल परिसरामध्ये इराणी व डवरी समाजाचे लोक पडेल ती कष्टाची कामे हे बांधव करत असतात.

प्रत्येक ऋतूमध्ये नागरिकांना आवश्यक गरजेच्या वस्तू उदा.
 स्वेटर,जर्किंग,गॉगल अशा हात विक्रीच्या व्यवसायातून या वस्तीतील लोक उदरनिर्वाह करतात.

या लोकांची रामानंदनगर ग्रामपंचायत दप्तरी रहिवाशी नोंद असुन प्रत्येक कुटुंबामध्ये शासनाची शिधापत्रिका ही आहे.. हे नागरिक मतदार ही आहेत.

मग या लोकांना हक्काची जागा आणि घर का नाहीत असा संतप्त सवाल ॲड दिपक लाड यांनी उपस्थित केला...

सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी या संवेदनशील विषयाकडे लक्ष केंद्रित करावे या लोकांनी तात्काळ रामानंदनगर येथे शासनाच्या जागेवर घरकुल बांधून द्यावीत अशी भावना ॲड दिपक लाड यांनी व्यक्त केली.

रामानंदनगर येथील अमीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली  वसाहती मधील लोकांना हक्काची घरे व मूलभूत सुविधा मिळण्याबाबत रस्त्यावरची व कायदेशीर लढाई चालू आहे.

 रामानंदनगर येथील बापूवाडीतील नागरी वस्तीला हक्काची घरे मिळण्याकरिता अमीर पठाण यांच्या लढ्यासोबत आम्ही एक पाऊल पुढे असू असे रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे सुरज महाराज सोळवंडे यांनी कळवले..

यावेळी अमीर पठाण, शिवाजीराव रावळ,रणसंग्राम चे सुरज सोळवंडे, विशाल कोंढाळकर,सुरज जाधव,सौरभ चव्हाण,यांच्यासह बापूवाडी येथील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆