yuva MAharashtra स्वामी रामानंद भारती विचारमंच च्या वतीने कृतज्ञता पुरस्कार जाहीर..

स्वामी रामानंद भारती विचारमंच च्या वतीने कृतज्ञता पुरस्कार जाहीर..




======================================
======================================

भिलवडी | दि. १६ नोव्हेंबर २०२२

स्वामी रामानंद भारती विचारमंच ब्रह्मानंदनगर, बुरुंगवाडी ता. पलूस यांच्या वतीने कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात आले.
विचारमंच चे अध्यक्ष अभिजित जाधव व कार्यवाह विकास हवालदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे  या पुरस्कारांची घोषणा केली.शिक्षण व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे द्राक्षगुरू वसंतराव माळी यांना ब्रह्मानंदनगर भूषण हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

                       द्राक्षगुरू - वसंतराव माळी

ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंदनगर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व विद्यार्थीप्रिय शिक्षक एस.पी.वाठारकर (येळावी) यांना कृतज्ञता पुरस्कार  जाहीर करण्यात आला आहे.

                              एस.पी.वाठारकर

शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शनिवार दिनांक १९ रोजी सायंकाळी ठीक ७ वा.ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

                     प्रमुख पाहुणे - राहुल सोलापूरकर 
              (व्याख्यान विषय - प्रतापगडचा रणसंग्राम)

यावेळी प्रतापगडचा रणसंग्राम या विषयावर राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान होणार आहे.पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाले बद्दल आकाश जाधव यांचा अभिनंदनपर  सत्कार करण्यात येणार आहे.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■


■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■