BANNER

The Janshakti News

सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा सांगली कडून संविधान दिनी भव्य कामगार मेळावा संपन्न...



=====================================
=====================================

सांगली | दि. २७ नोव्हेंबर २०२२
 
सांगली : २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त, संविधानाने कामगारांना दिलेले हक्क व अधिकार कामगारांना समजविण्यासाठी ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमरफारूक ककमरी यांनी दिली ते पुढे म्हणाले की कामगार जो पर्यंत आपले हक्क व अधिकार जाणून घेणार नाहीत तो पर्यंत  स्वतः च उद्धार करू शकणार  नाहीत त्यासाठी त्यांनी एकत्र येऊन संघटित झाले पाहिजे त्यांना एकत्रित करून संघटीत करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या संघटनेकडून करत आहोत आणि लवकरात लवकर आम्ही करू अशी आशा व्यक्त केली त्याच बरोबर मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांगली जिल्हाध्यक्ष अनिल मोरे व शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या उत्तम नियोजनामुळे व सर्व पदाधिकारीना यांच्या  सहकार्याने पार पाडले याबद्दल शुभेच्छा  दिले कार्यक्रमाला अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले यामध्ये डॉ. प्रकाश  आमनापुरे सर यांनी आरोग्य क्षेत्रात होत असलेल्या कामगारांचे शोषण थांबविण्यासाठी आपण रूग्णालय व कामगार यांच्या मध्ये दुवा म्हणून उत्तम काम भविष्यात कराल असे नमुद केले,रूग्णालय चालविणे जसे कठीण आहे पण कर्मचारी रूग्णालयात आपले म्हणून काम करत आहेत  तसेच रूग्णालयीन कामगारांची घरे पण व्यवस्थित रित्या चालावे यासाठी आम्ही पण सहकार्य करू तसेच आपल्या संघटनेकडून इंडियन मेडिकल असोसिएशन ला जे दहा मुद्द्यांच्या मागणी संदर्भात प्रस्ताव दिलेला आहे सदरचा प्रस्ताव विचाराधीन असून तो लवकरात लवकर आम्ही मंजूर करून आपणाला व कामगारांना एक विशेष भेट देणार आहोत असे आपल्या भाषणांमध्ये ते म्हणाले यामुळे कामगारांच्या जीवनात खुपच बदल घडेल यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव माननीय डॉक्टर मतीन शेख यावेळी उपस्थित होते.


 कामगार कायदे तज्ञ ऍड. बशीर मुलानी यांनी कामगारांचे कायदेशीर हक्क व अधिकाराबद्दल अगदी सहज व सोप्या भाषेत समजावून सांगितले तसेच  कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यात ते संघटने सोबत  संलग्न राहून काम करण्याची आश्वासित केले यानंतर संघटना व संघटित होण्यासाठी मार्गदर्शन मा. चंद्रकांत बाबर यांनी दिले शेवटी प्रा. बापूसाहेब माने यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि कामगार चळवळ या बद्दल तळमळीचे मार्गदर्शन करताना म्हणाले की आपण सर्वजण पदाधिकारी संघटनेच्या माध्यमातून वादळात ज्योत पेटविण्याचा प्रयत्न करीत असून संयमाने काम केल्यास आपले भविष्य खुपच उज्ज्वल आहे अशी हृदयस्पर्श शब्दातून मार्गदर्शन केले ह्या सर्वांच्या उपस्थित विशेष सन्मान म्हणून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अग्निशमन विभागातील फायरमन मानधन कर्मचारी रामचंद्र शिवाजी चव्हाण यांचा उत्तम कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 


कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सेवक बांधकाम, सर्व श्रमिक कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष मा. संजय भूपाल कांबळे व वंचित बहुजन आघाडी माथाडी व ट्रान्सपोर्ट आघाडीचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख मा. प्रशांत वाघमारे उपस्थित होते कार्यक्रमचे नियोजन सांगली जिल्ह्याकडून विशेषता शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले
संपूर्ण मेळाव्याचे सूत्रसंचालन हे सांगली जिल्हाध्यक्ष मा अनिल मोरे यांनी स्वतः केले त्यावेळी संस्थापक संचालक फिरोज मोमीन, रामचंद्र कोळी,अ.गफ्फार मुश्रीफ, वासंती निकम,तौफिक मिरजकर, विज्ञान लोंढे,हरीश वाघमारे,शिवाजी गुळवे, रुपाली वाघमारे, छाया मोरे, सागर आठवले,राकेश कांबळे, बाळासाहेब कांबळे,अनिल अंकलखोपे, वसंत भोसले,सचिन वाघमारे  प्रथमेश बनसोडे, आकाश भोसले,आबीद पटेल,शुभम चंदनशिवे ,सुजय दबडे, शुभम वावरे, सचिन साळुंखे, सुजाता पाटील, रेखा साळुंखे, मोनिका कांबळे,अनिता भगत,वासंती शिंदे, छाया धुळे,सीमा घोंगडे यांच्या बरोबर आरोग्य व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆