======================================
======================================
=====================================
भिलवडी | दि. 07 / 10 / 2022
भिलवडी ( ता.पलूस ) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाची नुकतीच निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी बाबासाहेब मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
२ ऑक्टोबर २०२२ रोजी सरपंच सौ.विद्या सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये हि निवड करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना बाबासाहेब मोहिते म्हणाले की तंटामुक्त समितीच्या माध्यमातून भिलवडी गावाला तंटामुक्त करण्याचा माझा मानस असेल. भिलवडी गावात अनेक जाती धर्मातील लोक एक दिलाने राहत आहेत. या गोष्टीला कुठेही तडा जाऊ न देण्याचा माझा प्रयत्न असेल. भिलवडी गावातील तमाम लोकांनी गाव तंटामुक्त करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असेल आणि आपलेही भिलवडीकरांचे सहकार्य लाभावे..
यावेळी उपसरपंच पृथ्वीराज पाटील , माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास (आण्णा) पाटील , माजी सरपंच शहाजी (भाऊ) गुरव , माजी उपसरपंच बाळासाहेब मोरे , मोहन तावदर , माजी सरपंच व विद्यमान सद्स्या सौ.सविता महिंद पाटील , गावातील विविध विभागातील शासकीय पदाधिकारी , ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या सह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुवनेश्वरीवाडी येेथे एका कार्यक्रमाच्यावेळी मा.राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते बाबासाहेब मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●