BANNER

The Janshakti News

सांगलीच्या दत्त इंडिया या खाजगी कारखान्याने एक रकमी 2961 रुपये देण्याचे जाहीर करून सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली..



एक रक्कमी एफ आर पी जाहीर करण्यासाठी जिल्ह्यातील इतर साखर कारखानदाराना चार दिवसांचा अल्टिमेट.. 

अन्यथा पाच तारखेपासून ऊस तोडी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.





======================================


======================================

सांगली | दि. 29 / 10 / 2022

सांगलीच्या दत्त इंडिया या खाजगी कारखान्याने एक रकमी 2961 रुपये देण्याचे जाहीर करून सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे हे स्वाभिमनीच्या आंदोलनाचे यश आहे त्याचा आदर्श क्रांती, राजारामबापू, सोनहिरा, विश्वास , रविशंकर या कारखान्यांनी घेवून एक रकमी एफ आर पी जाहीर करावी अन्यथा धूराडे पेटू देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

खराडे म्हणाले शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखाण्यानी एक रकमी जाहीर केली आहे गेल्या वर्षीही कोल्हापूर जिल्ह्यात एक रकमी एफ आर पी दिली होती मात्र गेल्या वर्षीही सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी दिली नव्हती यंदाही सहकारी साखर कारखाने एक रकमी एफ आर पी देण्याबाबत काहीच बोलायला तयार नाहीत दत्त इंडिया अर्थात.वसंतदादा कारखान्याने गत वर्षी 2851 रुपये दर दिला होता त्यात 110 रुपयाची वाढ करून एक रकमी दर जाहीर केला आहे हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे

सांगली जिल्ह्यात राजारामबापू कारखान्याचे सर्वोदय , साखराळे, वातेगाव आणि जत अशी चार युनिट आहेत क्रांती, सोन हिरा. उदगीरी, हुतात्मा, विश्वास, निनाई, रविशंकर, मोहनराव शिंदे आदी 12 कारखाने सुरू आहेत या कारखान्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही.

गाड्या अडवणे, कारखाने बंद करणे, टायर फोडणे आदी करण्याची वेळ साखर सम्राटांनी आमच्यावर आणू नये येत्या चार दिवसांचा अल्टिमेट आम्ही कारखानदारांना देत आहोत अन्यथा पाच तारखे पासून जिल्ह्यात ऊस तोडी बंद ,गाड्या अडवणे सुरू करण्याचा इशारा देत आहोत साखर सम्राटांनी शेतकऱ्याच्या सहन शक्तीचा अंत बघू नये

शेतकरी अगोदरच अती पावसामुळे मेटाकुटीला आला आहे ऊस वगळता अन्य पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे लवकरात लवकर एक रकमी एफ आर पी जाहीर करावी अन्यथा परिणामास सामोरे जावे असा इशारा खराडे यांनी दिला आहे.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆