BANNER

The Janshakti News

भिलवडी स्टेशन येथे रास्ता रोको आंदोलन.. भिलवडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी व भिलवडी स्टेशन येथील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..



====================================


====================================

भिलवडी | दि. ३० ऑगस्ट २०२२

भिलवडी ते पाचवामैल रस्ता रुंदीकरणाचे काम गेली दोन वर्षे झाली रखडले आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना वहान चालक , नोकरदार , शालेय विद्यार्थी व प्रवाशी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर असताना सुद्धा
 या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना चिखलमय व खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. 
 राज्यमार्ग 151 टोप ते दिंघची या रस्त्याचे काम गेले दोन वर्षे रखडले आहे त्यामुळे सोशिकतेचा अंत म्हणून पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन चौकात प्रशासनाच्या गलथानपणा विरोधी रोष व्यक्त करण्यासाठी वाहन धारकांसह नागरिक रस्त्यावर उतरले व सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.


भिलवडी ते पाचवामैल रस्त्याच्या कामात कसलाही अडथळा नाही,  एकही तक्रार नाही,  या कामाला कोणाचाही विरोध नाही असे असताना देखील गेली दोन वर्षे काम रखडत ठेऊन प्रशासन आणि कंत्राटदाराने परीसरातील जनतेला वेठिस का धरले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी आणि या गंभीर समस्येचा  जाब विचारण्यासाठी  रस्त्यावर उतरल्याचे नागरिकांनी यावेळी   सांगितले.
यावेळी दत्ता उतळे, संताजी जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदिप राजोबा , माणिक माने, विजय शिंदे , उत्तम जाधव, भिलवडी स्टेशनचे ग्रामपंचायत सदस्य प्रविण शिरतोडे, रितेश कांबळे , राजेंद्र यादव , सचिन चंदुगडे , विशाल शिंदे , रमेश पाटिल , खंडोबाचीवाडीचे सरपंच धनंजय गायकवाड आदिसह परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी  भिलवडी पोलिस स्टेशनचे सहा.पो.निरीक्षक कैलास कोडग यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.




 दोन महिन्याच्या आत रस्ता दुरुस्त करून देण्याचे लिखित आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या वतीने देण्यात आले. तर रेल्वे ओव्हरब्रीजचे काम ८ महिन्यात पुर्ण करण्याचे महा रेल च्या वतीने  लेखी आश्वासन दिले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆