BANNER

The Janshakti News

एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का..? संतप्त नागरिकांचा सवाल.. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी उसातून पायपीट..=====================================


=====================================

वांगी (ता.कडेगाव) | दि.१७ ऑगस्ट २०२२

वांगी गावातील धक्कादायक प्रकार

 वांगी (ता. कडेगाव) येथील देवराष्ट्रे रोड स्मशानभूमि पाठीमागील लोकवस्तीला जाणार रस्ता तेथील हिस्सेदारांनी बंद केल्यामुळे विलास माने वय 70 वर्ष यांना हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी उसाच्या शेतातून मार्ग काढत रुग्णवाहिकेपर्यंत पोचवावे लागले.
त्यामुळे पालघर मधील खेड्यामध्ये जी अवस्था आहे त्याची प्रत्यक्ष पुनरावृत्ती आज वांगीमध्ये झाली या लोकवस्तीमध्ये जवळपास 40 कुटुंबे आहेत या लोकवस्तीला रितसर रस्ता अद्याप नाही स्मशानभूमी जवळून पर्यायी रस्ता करण्यात आला होता परंतु हिस्सेदारांच्या वादविवादामुळे पुन्हा मागील दोन दिवसांपूर्वी रस्ता बंद करण्यात आला.


 तेथील रहिवाशी विलास माने यांची प्रकुर्ती अचानक खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावयाचे होते रस्ता नसल्यामुळे घरापासून सुमारे 400 ते 500 फूट अंतरावर रुग्णवाहिका थांबवून विलास माने या वृद्ध रुग्णाला नातेवाईकांनी स्ट्रेचरवरून उसाच्या शेतातून रुग्णवाहिकेपर्यंत पोचविले यानंतर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
संबंधित महसूल प्रशासनाने लवकरात लवकर या गंभीर प्रकरणाकडे लक्ष्य देऊन या लोकवस्तीला रस्ता करून दयावा
येखांद्याचा जीव गेल्यानंतर हे प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल या वस्तीतील नागरिकांतून विचारला जात आहे.
अन्यथा आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे येथील रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆