BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार...





भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार...
 
=====================================


=====================================

भिलवडी दि.03 जुलै 2022

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीचा सलग आठव्या वर्षीही 100% निकाल लागला. दिनांक 01 जुलै 2022 रोजी इ. 10 वी मध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच 90% व 90% पेक्षा जास्त टक्केवारी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  यामध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना अंकलखोप गावचे रहिवासी श्री. जिनपाल हनमाने सर यांच्यामार्फत रोख रक्कम बक्षीसाच्या रूपात देण्यात आली. गेली सात वर्ष ते हा उपक्रम राबवत आहे व पुढेही राबविला जाणार आहे. तसेच इयत्ता दहावीच्या वर्गास शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचा देखील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे 


 श्री. जिनपाल हनमाने गुरुजी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे संचालक श्री. गिरीश चितळे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षकांचे कौतुक देखील केले व इथून पुढे ही 100% निकालाची परंपरा अशीच सुरू राहावी यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक श्री. डॉ.सुनील वाळवेकर  व व्यंकोजी जाधव  तसेच शाळेच्या पालक प्रतिनिधी सौ. लीना  चितळे, के.जी.विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने , प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व यशस्वी विद्यार्थी व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक देखील उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सीमा पाटील  यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ.अश्विनी महिंद  यांनी करून दिली व आभार सौ. मंजुषा शिंदे  यांनी मानले. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆




◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆