BANNER

The Janshakti News

भिलवडी- माळवाडी येथे उद्या रविवार दि.१२ जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर...

भिलवडी- माळवाडी येथे उद्या रविवार दि.१२ जून रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर...

=====================================


=====================================

भिलवडी | दि. ११/०६/२०२२

     स्पंदन हॉस्पिटल अँड आयसीयू आष्टा,  आदिती डायग्नोस्टिक सेंटर आष्टा  आणि डॉक्टर्स असोसिएशन भिलवडी व माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बाबासाहेब चितळे मेमोरियल ट्रस्ट माळवाडी या ठिकाणी  जायन्ट्स परिवाराच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन रविवार 12  जुन रोजी करण्यात आले आहे. 

यामध्ये रक्तातील साखर, एच बी, रक्तातील चरबी,  रक्तदाब या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत अशी माहिती जायंट्स ग्रुप भिलवडी चे अध्यक्ष श्री.  सुनील परीट यांनी दिली. या शिबिराचे नियोजन जायन्ट्स वेलफेअर दोन क चे अध्यक्ष श्री. गिरीश चितळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे .

      या शिबिरामध्ये अल्पदरात एक्स-रे , टीएमटी, सोनोग्राफी, आणि टू डी इको तपासणी 25%  सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये डॉक्टर सुमित कबाडे, डॉक्टर अमृता कबाडे यांचे मोफत मार्गदर्शन होईल. तरी या शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. येताना सोबत जुने रिपोर्ट व ट्रीटमेंट फाईल घेऊन यावी अशी सुचना संयोजनकां मार्फत करण्यात आली आहे . शिबिर सकाळी  9 ते दुपारी 2 या कालावधीमध्ये संपन्न होईल.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●