BANNER

The Janshakti News

गुगल सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर कारवाई बाबत आंदोलन.. गुगल मधील जातीवाद रोखण्याची मागणी, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे निवेदन..





गुगल सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर कारवाई बाबत आंदोलन..

गुगल मधील जातीवाद रोखण्याची मागणी, रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे निवेदन..

=====================================


=====================================

सांगली | दि.१३/०६/२०२२ 

एक्विलिटी हबच्या प्रमुख दलित नागरी हक्क कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्यराजन यांचे अमेरिकेत गुगल येते जातीवर आधारित विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. 

गुगलमधील वरिष्ठ अधिकारी तनुजा गुप्ता यांनी हे चर्चासत्र आयोजित केले होते. गूगल मधील तब्बल ८००० मनुवादी कर्मचाऱ्यांनी सीईओ सुंदर पिचाई यांच्याकडे हे चर्चासत्र रोखण्याची मागणी केली आणि सीईओ सुंदर पिचाई यांनी या महिला दलित वक्त्याला हिंदूविरोधी संबोधित करून त्यांचे नियोजित गुगलमधील चर्चासत्र रद्द केलं . 

या घटनेचे संपूर्ण जगभरात निषेध होत आहे. भारतातील जातीय व्यवस्था भारताबाहेर देखील रुजवली जात आहे, ही गंभीर बाब आहे. आशिया खंडाच्या आरक्षण मधून निवड झालेल्या अश्या जातीवादी अधिकारी, कर्मचारी हे भारतातील आरक्षणाला विरोध करतात पण अमेरिकेत असलेल्या आशिया खंडातील व्यक्तींच्या आरक्षण मधून उच्च पदे उपभोगतात आणि जातिवाद पेरण्याचे काम करतात. 




विषमता, जातीयतेच्या बळावर भारतात मागासवर्गीयांना सर्व स्तरावर जातीयतेच्या चटक्याला सामोरे जावे लागत आहे. जातीयता ही राष्ट्रीय आपत्ती झालेली आहे. ती जागतिक आपतीच्या दिशेने निघाली आहे. भाषण स्वतंत्र, विचार स्वतंत्र जातीमुळे बंधिस्त करणार का? महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सामाजिक स्वतंत्र बहाल केले ते हे मनुवादी हिरावून घेत आहेत. भारतातील हिंदू राष्ट्रवादी चळवळीचा परिणाम या गुगल सारख्या मोठ्या कंपनीत होताना दिसत आहे. 

सुंदर पिचाई सह इतर ८००० कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करून कडक कारवाई करावी या करिता सोमवारी दि.१३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. 

यावेळी  रिपब्लिकन स्टुडटंस युनियनचे प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेना प.महाराष्ट्र प्रमुख स्वप्नील खांडेकर, तानाजी जाधव, राम नंदीवाले, निशाताई बचूटे, रोहित वाघमारे, बाबासो तांबे, शिवराज गडदे आरपीआयचे उपाध्यक्ष दिनेश साबळे, आदी उपस्थित होते.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆




◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆