BANNER

The Janshakti News

तलवाडा येथे हिंगणगावातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यास सर्व शेतकरी बांधवांनी केली श्रद्धांजली अर्पित..तलवाडा येथे हिंगणगावातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यास सर्व शेतकरी बांधवांनी केली श्रद्धांजली अर्पित..

=====================================
=====================================

तलवाडा | दि.14 मे 2022

बीड जिल्हा गेवराई तालुक्यातील हिंगणगावातील शेतकरी नामदेव जाधव याने ऊस जात नसल्याच्या कारणास्तव स्वता ऊस पेटऊन देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची रदयस्पर्शी घटना घडली होती. या शेतकऱ्यासह अशा अनेक शेतकऱ्यांना शासनस्तरावर न्याय मिळावा यासाठी तलवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तलवाडा व परिसरातील शेतकरी बांधवांच्या वतीने मयत नामदेव जाधव यास सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली.


 यावेळी आनेक शेतकरी बांधवांनी श्रद्धांजलीपर आपल्या व्याथा व वेदनाचा ऊहापोह करुन या घटनेस सर्व प्रथम ऊस कारखानदार व नंतर शासन जबाबदार आसल्याचे म्हणत आत्महत्या ग्रस्त मयत शेतकरी नामदेव जाधव यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून ध्यावा आशी रास्त मागणी श्रद्धांजलिच्या आयोजित स्थळावरुन केली या वेळी मय्यत शेतकरी नामदेव जाधव यांचा सात वर्षाचा मुलगा व बंधुसह  मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●