१९९८ ची विद्यार्थ्यांचा गेट- टुगेदर मेळावा संपन्न
तब्बल २४वर्षांनी आपल्या शैक्षणिक घरट्याकडे मुलं-मुली
=====================================
=====================================
पलूस | दि.11 मे 2022
हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल आंधळीच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर मेळावा तब्बल 24 वर्षानंतर आंधळी हायस्कूल मध्ये संपन्न झाला यावेळी आजी माजी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या तसेच माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या हा कार्यक्रम सहकुटुंब आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिक्षक शिक्षिका यांचे हस्ते फोटो पुजन करून तसेच स्वर्गवास झालेल्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .शिक्षक व मुलांनी मनोगत व्यक्त केले.शालेय जुन्या आठवणीना उजाळा देण्यात आला.
या बॅचचे विद्यार्थी शिक्षक, क्लासवन ऑफिसर ,आर्मी, वकिल, इंजिनियर, पोलिस, पत्रकार, व्यवसायिक, शेतकरी अशा क्षेत्रात काम करणारे हे आज या शाळेत पुन्हा एकदा विद्यार्थी असल्याचे दिसून आले.यामध्ये कोण मोठा लहान हा भेद भाव बाजूला ठेवून शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे शिस्त बध्द विद्यार्थी पहायला मिळाले.काही शिक्षक , क्लार्क, शिपाई व विद्यार्थी स्वर्गवास झाले.त्यांच्या आठवणी ने कंठ दाटून आले होते.
या कार्यक्रमात शिक्षक व माजी विद्यार्थी याचे केमेऱ्यात टिपलेले क्षण (फोटो) सोशल मीडिया वर प्रसिद्ध करताच काही अडचणी मुळे उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आपन उपस्थित नसल्याचे दुःख झाले बद्धल सोशल मीडिया द्वारे मत व्यक्त करण्यात आले तसेच यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षिका,शिपाई व सर्व माजी विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सांगता करतेवेळी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे गीत सर्व वर्ग मित्र मैत्रीणीनी एकत्रित रित्या गायन् केले.
संपूर्ण कार्यक्रमानंतर ज्यावेळी निरोप घेऊन निघण्याची वेळी आल्यानंतर विद्यार्थ्यांना कंठ दाटून अश्रू अनावर झाले व पुन्हा एकदा आप आपल्या घरट्यांच्या दिशेने सर्वजन निघून गेले.
यावेळी आजी माजी शिक्षक शिक्षिका, शिपाई, मित्र मैत्रिणीनी, परिवारासह उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆