BANNER

The Janshakti News

पत्रकार मारहाण प्रकरणी वाळू तस्करांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल, उपविभागीय पोलीस आधिकारी कदम यांच्याकडे तपास...



पत्रकार मारहाण प्रकरणी वाळू तस्करांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल.... 

उपविभागीय पोलीस आधिकारी कदम यांच्याकडे पुढील तपास...


------------------------------------------------------------------- 


-------------------------------------------------------------------

कडेगाव | ता. ०३ / ०३ / २०२२

वडियेरायबाग ता. कडेगाव येथील पत्रकार सुरज  जगताप यांना मारहाण केल्याप्रकरणी वाळुतस्कर हणमंत किसन वाघमोडे ( वय 35), जयपाल किसन वाघमोडे (वय 30) दोघे रा. वडियेरायबाग व धैर्यशील बाबर (वय 30 रा.विटा) यांच्याविरोधात रात्री ऊशीरा चिंचणी- वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी वरील हणमंत किसन वाघमोडे व जयपाल किसन वाघमोडे या दोन आरोपीनी पत्रकार सुरज जगताप यांच्या घरात घुसून आमची माहीती तहसीलदार व प्रांत यांना का देतोस म्हणुन काठी व लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांचा मोबाइल फेकुण दिला होता. यावेळी सुरज यांच्या खिशातील रक्कमही चोरीस गेली होती. तर आरोपी धैर्यशिल बाबर याने सुरज यांना फोनवरुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी कलम 452, 324,327,427,504, 506, 34 नुसार महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व प्रसार माध्यम संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अंर्तगत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस आधिकारी पदमा कदम करित आहेत. याप्रकरणी पोलीसांनी सुरवातीला केवळ अदखलपात्र गुन्हाची नोद केली होती. पत्रकार संघटनेच्या लढ्यानंतर पोलिसांनी वरील कलमांअर्तगत आरोपीं विरोधात गुन्हा नोद केला आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆