BANNER

The Janshakti News

सांडगेवाडी ( पलूस ) येथे माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी...



सांडगेवाडी ( पलूस ) येथे माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी...

=====================================


=====================================

पलूस | दि. २० / ०३ / २०२२

सांडगेवाडी तालुका पलूस येथे माजी वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायत सांडगेवाडी यांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून पर्यावरण पूरक उपक्रम हे ग्रामपंचायतीच्या मासिक तसेच ग्रामसभेत राबवणे बाबत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायतीची मा. सरपंच सौ मनीषा ताई शिंदे पाटील तसेच ग्रामसेवक अजित माने यांनी दिली.


सांडगेवाडी ग्रामपंचायतीने माजी वसुंधरा अभियानांतर्गत पृथ्वी वायु जल आकाश अग्नी या पंचतत्त्वांना हानी पोचू नये तसेच त्याचे संवर्धन व्हावे पर्यावरणाचे प्रदूषण थांबावे यासाठी गावचा विशिष्ट आराखडा तयार केला असून आत्तापर्यंत गावातील सर्वात जुने वृक्षांची नोंदणी, पर्यावरण पूरक गणेश उत्सव, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, जलसंवर्धन, प्रदूषण मुक्त दिवाळी, सायकल ट्रॅक ,ई बाइक खरेदी बाबत जनजागृती इत्यादी उपक्रम राबवले असून तसेच संपूर्ण पलूस तालुक्यातील सर्व ग्रामसेवक संगणक परिचालक यांची कार्यशाळा ग्रामपंचायत सांडगेवाडी येथे दिनांक -17/03/2022 रोजी पार पडली.


सदरच्या कार्यशाळेस सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.तानाजी लोखंडे साहेब तसेच पलूस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ स्मिता पाटील मॅडम व आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या रितिका वकील मॅडम पलूस पंचायत समितीचे विस्ताराधिकारी डी.सी खाडे साहेब यांनी मार्गदर्शन केले सर्व संयोजन ग्रामपंचायत सांडगेवाडी चे सरपंच सौ मनीषा शरद शिंदे पाटील उपसरपंच श्री सुशील अशोक दंडवते श्री सुरज सूर्यवंशी संजय देसाई सौ गीतांजली जाधव सौ अलका शिंदे सौ कल्पना वडार श्रीमती आक्काताई सांडगे सौ.अनिता गाडे सौ.सुशीला सांडगे व सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक अजित माने व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी अक्षय देसाई,वैभव शिंदे, यांनी केले व सदरच्या अभियानात अव्वल येण्याची शपथ सर्वांनी घेतली.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆