BANNER

The Janshakti News

महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पैठनची एकनाथषष्ठी यात्रा पूर्ण क्षमतेने भरणार..



महाराष्ट्रातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पैठनची एकनाथषष्ठी यात्रा पूर्ण क्षमतेने भरणार..

======================================
======================================

बिड | दि.22/03/2022

बीड जिल्हा प्रतिनिधी - बाळराजे जाधव 

मराठवाड्यासह महाराष्ट्रातील वारकर्‍यांचं लक्ष लागून असलेल्या नाथषष्टी यात्रेला अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नाथषष्ठी यात्रा पूर्णक्षमतेने भरवण्यास अखेर परवानगी दिली आहे.
 
औरंगाबाद  मराठवाड्यासह महाराष्ट्रातील वारकर्‍यांचं लक्ष लागून असलेल्या नाथषष्टी यात्रेला अखेर परवानगी मिळाली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी नाथषष्ठी यात्रा पूर्णक्षमतेने भरवण्यास अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर नाथषष्ठी यात्रा पूर्णक्षमतेने भरणार आहे. तर प्रशासनाच्या या निर्णयाचं नाथवंशज आणि वारकऱ्यांनी स्वागत केलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा टक्का कमी असल्याने जिल्हा ‘ए कॅटीगरी’त नव्हता. त्यामुळे २०० पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात येत नव्हती. त्यामुळे यावर्षी नाथषष्ठीला परवानगी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान यावर निर्णय घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी, नाथ वंशज, महंत, पोलीस प्रशासन, वारकरी यांची उपस्थिती होती. यावेळी अखेर नाथषष्ठी पूर्णक्षमतेने भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
तब्बल दहा लाख क्षमता असलेल्या मैदानात नाथषष्ठी भरवली जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्रभरातून 40 हजार पेक्षा जास्त वारकरी या यात्रेत सहभागी होतात. २३ तारखेपासून यात्रेला सुरवात होणार असून, २३ मार्च रोजी विजयी पांडुरंगास महाभिषेक, वारकरी पूजन, संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचे चित्रप्रदर्शन, कुलोत्पन्न नाथवंशजांची मानाची दिंडी, महाप्रसादाचा कार्यक्रम असेल. तर २४ मार्च रोजी सप्तमीच्या दिवशी छबिना व गुरुपूजन होईल. तसेच २५ मार्च रोजी अष्टमीच्या दिवशी काला दहीहंडीचा कार्यक्रम असेल.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆