BANNER

The Janshakti News

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा... शालेय जीवनात प्रत्येकाने शिक्षणाचे उद्दिष्ट ठेवावे... मा.पल्लवी चव्हाणभिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा...

शालेय जीवनात प्रत्येकाने शिक्षणाचे उद्दिष्ट ठेवावे...
                                    मा.पल्लवी चव्हाण 

======================================


======================================

भिलवडी | ता. ०९ / ०३ / २०२२ 

पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या इ.१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ  उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून मा.पल्लवी चव्हाण (आर.एफ.ओ.पलू-कडेगाव) ,  भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक व चितळे उद्योग समुहाचे उद्योजक मा.गिरीश चितळे , संस्थेचे सचिव मा.मानसिंग हाके , पालक प्रतिनिधी मा.सौ.लिना चितळे , मुख्याध्यापिका कु.विद्या टोणपे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
 मा.पल्लवी चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की  ''विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून उत्तुंग भरारी घ्यावी"  तर संस्थेचे संचालक मा.गिरीश चितळे यांनी १०० टक्के निकालाची परंपरा अखंडित राहावी असे म्हणाले, व  विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले.संस्थेचे सचिव मा.मानसिंग हाके सर  यांनी स्वागत, मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली व स्कूलला भेट वस्तू देऊन ॠण व्यक्त केले.यावेळी  सर्व शिक्षक , शिक्षकेतर सेवक व १० वीचे  सर्व विद्यार्थी  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आदिती  देशपांडे तर आभार किर्ती चोपडे यांनी मानले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆