BANNER

The Janshakti News

शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा - सुधाकर वायदंडे यांची मागणी..शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा - सुधाकर वायदंडे यांची मागणी.. 

====================================


====================================

शिराळा | ता. ०२ /०३ / २०२२

शिराळा तालुक्यातील पश्चिम भागामधील  (कोकरूड,बिळाशी,मांगरूळ,रिळे परिसर)बिबट्यांचा वावर वाढला आहे त्या बिबट्यांचा त्वरित वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी दलित महासंघ युवक आघाडी अध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी केली आहे. 
  याबाबतचे निवेदन दलित महासंघाच्या वतीने वनविभागाचे बाबासाहेब गायकवाड यांना देण्यात आले. 
        सुधाकर वायदंडे म्हणाले, बिबट्याचे पश्चिम भागात 
दर्शन होऊ लागले आहे तसेच शेळ्या व इतर जनावरांवर बिबट्याने हल्ला करण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे.
    परंतु या घटनेचे गांभीर्य न ओळखता वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त कारण्यासंदर्भात कोणतीही ठोस अमलबजावणी होताना दिसत नाही वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे  रात्री अपरात्री  शेतात गेलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काही अघटित घडले तर त्याला जबाबदार कोण ? शेतकऱ्यांच्या शेळ्या किंवा इतर जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्यास होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी वनविभाग घेणार का ? 
   तरी शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील बिबट्यांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा दलित महासंघाच्या वतीने शिराळा येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे. निवेदनावर सुधाकर वायदंडे,सिताराम पांढरे,दिनकर नांगरे,प्रकाश पाटील,सत्कार गायकवाड,विकास घाटे,संतोष शिंदे,यांच्या सह्या आहेत.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆